Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पुण्यात पुन्हा हिट अँड रन; चारचाकीने दुचाकीस्वाराला नेलं फरफटत, धडकी भरवणारा VIDEO

10

पुणे (पिंपरी ): पुण्यात हिट अँड रनच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे. त्यात पिंपरी-चिंचवड परिसरातून हिट अँड रनचे नवीन प्रकरण समोर आले आहे. भरधाव चार चाकीने दुचाकी चालकाला स्वाराला काही अंतरापर्यंत फरफटत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपळे गुरव येथील मेन बस स्टॉप येथे हा भयंकर प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. हा व्हिडिओ अंगावर शहारे आणणारा आहे.

या घटनेमध्ये कार चालकाने काही अंतरापर्यंत फरफटत नेल्याने दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर चारचाकी चालकाने घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती समोर आली आहे. चारचाकी चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचं प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आलं आहे. बुधवारी (७ ऑगस्ट) दुपारी चार वाजताच्या सुमारास ही भयंकर घटना घडल्याची माहिती आहे.
Hit And Run: पुन्हा हिट अँड रन! भरधाव स्कॉर्पिओची धडक, बाइकसह तरुण दूरवर फेकला गेला अन् पाटील कुटुंबाने लेक गमावला
या अपघाताचं धडकी भरवणारं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे एक चारचाकी चालक दुचाकी स्वाराला काही अंतरापर्यंत फरफटत नेत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा दुचाकीस्वार गाडीच्या समोरच्या चाकात अडकल्याचं दिसत आहे. त्यामुळे दुचाकीस्वाराला कारने मागून धडक दिली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या प्रकरणात चारचाकी चालक अपघातानंत घटनास्थळावरून फरार झाला. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं आणि दुचाकीस्वाराला रुग्णालयात पाठवलं. या अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, पोलिस सध्या फरार कारचारलकाचा शोध घेत आहेत.

राज्यात हिट अँड रनच्या प्रकरणांमध्ये वाढ

हिट अँड रनच्या घटनांमध्ये राज्यभरात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अनेकजण मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून लोकांना उडवत असल्याचं समोर आले आहे. पोलिसांनी आता याबाबत कडक पावले उचलण्याची गरज असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. यामुळे दुचाकी स्वारांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. पिंपळे गुरवमध्ये घडलेल्या या घटनेने लोकांमध्ये घबराट पसरली आहे आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.