Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आधी बायको तुरुंगात, मग लेकीची नोकरी गेली; आता पूजा खेडकरचे वडील अडचणीत, पोलिसांची कारवाई

10

पुणे: पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांच्या विरोधात मोठी कारवाई झाली आहे. काल रात्री बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम १८६, ५०४ आणि ५०६ च्या अंतर्गत दिलीप खेडकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप खेडकरांविरोधात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील एका तहसीलदारानं तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी पुणे पोलिसांनी त्यांना जबाब नोंदवण्यास बोलावलं होतं. त्यानंतर सकाळी दिलीप खेडकरांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पूजा खेडकर पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण घेत असताना तिचे वडील दिलीप खेडकर जिल्हाधिकारी कार्यालयात यायचे. त्यांनी तहसीलदार आणि अन्य कर्मचाऱ्यांना पूजा खेडकरला स्वतंत्र केबिन देण्यासाठी धमकी दिली होती. याच प्रकरणात दिलीप खेडकर यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आलेला आहे.
Gujarat News: वर्षातून एकदा अमेरिकेतून येते शिक्षिका; दर महिन्याला घेते पगार; चक्रावून टाकणारं गुजरात मॉडेल
पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांच्याविरोधातही कलम ३२३, ५०४, ५०६, १४३, १४४, १४७, १४८ आणि १४९ सह आर्म्स ऍक्टखाली एफआयआर दाखल आहे. मनोरमा खेडकरांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात त्या पिस्तुल दाखवत होत्या. यानंतर मनोरमा खेडकरांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली होती. रायगडच्या महाडमधून त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. त्या तिथे एका हॉटेलमध्ये थांबल्या होत्या. मनोरमा खेडकर यांना २ ऑगस्टला पुणे न्यायालयानं जामीन दिला. त्यानंतर ३ ऑगस्टला येरवडा तुरुंगातून त्यांची सुटका झाली.
Uddhav Thackeray: ‘नितीश प्लॅन’ फसला, ठाकरेंसमोर काँग्रेस नेत्यांनी चुकांचा पाढा वाचला; दिल्ली दौरा फ्लॉप?
पूजा खेडकरच्या आईनंतर आता तिचे वडील गोत्यात आले आहेत. दिलीप खेडकर २०२० मध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या संचालक पदावरुन निवृत्त झाले आहेत. आता पोलिसांनी त्यांच्याविरोधातही कारवाई सुरु केली आहे. त्यामुळे खेडकर मायलेकीनंतर आता त्यांच्याही अडचणी वाढताना दिसत आहेत.

पूजा खेडकरची उमेदवारी केंद्रीय लोकसेवा आयोगानं रद्द केली आहे. त्यासोबतच यूपीएससीनं तिला काळ्या यादीत टाकलं आहे. त्यामुळे पूजा खेडकर भविष्यात कधीही यूपीएससीची परीक्षा देऊ शकत नाही. यूपीएसएसच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी तिच्यावर ही कारवाई झालेली आहे. या प्रकरणात पूजा खेडकरनं उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.