Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आश्वासन, महिला भगिनींना शब्द, दादांचा नाशिकमध्ये वादा

12

नाशिक, लासलगाव : राज्याचा साडे सहा लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आपण मांडतो. यातून महिलांना सबळ, सक्षम बनविण्यासाठी आपण लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पातून ४५ हजार कोटी रुपये महिलांच्या योजनेसाठी बाजूला ठेवणं हे सहज शक्य आहे आणि आपण महायुती सरकारने ते केलं आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने काढण्यात आलेल्या जन सन्मान यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मंत्री छगन भुजबळ व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात लाडकी बहीण संवाद मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
Ajit Pawar: मी कालच ६००० कोटींच्या फाईलवर सही केली आहे! अजित पवारांचा ‘लाडक्या बहिणीं’ना शब्द

यावेळी मुंबई अध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ, महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पगार यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते व महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.
Ajit Pawar: …यासाठी लाडकी बहीण योजना आणली, पुढे चालू ठेवायचीय? तर आमच्या नावापुढची बटणं दाबावीत, अजित दादांचे विधान

यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले की, महायुती सरकारच्या योजनांचा लाभ मिळून महिला सबळ, सक्षम व्हाव्यात यासाठी आपला प्रयत्न आहे. जनतेची शक्ती अनेक दिवसांपासून आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. त्या जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांचं पाठबळ मिळविण्यासाठी आम्ही जन सन्मान यात्रा सुरू करण्यात आली आहे.
सत्ता दिल्यास २४ तासांत आरक्षण देतो, राणाभीमदेवी थाटात सांगणारे फडणवीस प्रश्न का सोडवत नाहीत? : नाना पटोले

महिलांना लाडकी बहिण योजनेच्या पहिल्या दोन महिन्यांचे पैसे देण्यासाठी ६ हजार कोटी रुपयांची फाईल माझ्या समोर आली. त्यावेळी महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून आपण त्यावर आपण तात्काळ सही केली. काही लोक सांगत असतील ही योजना पुढे चालणार नाही. मी सर्वांना सांगतो की महायुतीचे सरकारमध्ये ही योजना पुढील पाच वर्ष सुरू ठेवण्यात येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी उपस्थित महिलांना दिला.
रक्षाबंधनपूर्वीच बहि‍णींना मिळणार ओवाळणी! लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता ‘या’ तारखेला मिळणार

ते म्हणाले की, सर्व जाती धर्मांना न्याय देण्याचे काम आम्ही करू. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजाला सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं. या फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात कुठलाही भेदभाव होणार नाही. राज्यातील सर्व समाजाला सक्षम करण्यासाठी विविध महामंडळाची व संस्थांची निर्मिती करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
Ajit Pawar : लोकसभेच्या निकालाने मी नाराज नाही, पराभवाला मी स्वत: जबाबदार; रोखठोक दादांकडून विषय एन्ड

कांदा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांदा निर्यात बंदी करू नये, असा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. शेतकरी बांधवांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुधाला ५ रुपये अनुदान आपण जाहीर केलं आहे. या योजनांचा फायदा जनतेला होण्यासाठी आपला प्रयत्न आहे, असे अजित पवार म्हणाले.

नाशिकला पिण्याच्या पाण्यासाठी किकवी प्रकल्पाला मंजुरी देण्यात येऊन लवकरच किकवी धरणाची उभारणी केली जाईल. आचारसंहिता लगायच्या आत नार पार ही महत्वपूर्ण योजना मंजूर करण्यात येणार तसेच पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळविण्यासाठी आपले प्रयत्न आहे. यासाठी हजार कोटी रुपयांची योजना आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी आणून हे प्रकल्प आम्ही मार्गी लावू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.