Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Maratha Reservation: आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार आणि भुजबळांना राज्यात दंगल व्हावे असे वाटते; कोल्हापुरात जरांगे पाटलांचा गंभीर आरोप

8

कोल्हापूर: मराठा आरक्षणाच काम अंतिम टप्प्यात आलेल आहे. केवळ सगे सोयरांच अध्यादेश येण बाकी आहे. कुणबी शोधायचं काम सुरू आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मी थांबत नाही सरकारला काय ताकत लावायचे लावू दे. सध्या हात जोडून, उपोषण करून सांगत आहे. आरक्षण द्या, मात्र नाही ऐकले तर पाडायची भूमिका घ्यावी लागेल. जशी लोकसभेला भूमिका घेतली तशी विधानसभेलाही घ्यावे लागेल त्याशिवाय पर्याय नाही. असे 29 तारखेला अंतरवाली सराटीमध्ये या पाडायचं का निवडून आणायचं ठरवू, असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. ते आज कोल्हापुरात शांतता रॅली दरम्यान बोलत होते.

अन्यथा लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही पाडावं लागेल

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा महाराष्ट्र दौरा सुरू असून गेल्या तीन दिवसांपासून ते पश्चिम महाराष्ट्रात दाखल झाले आहेत. सोलापूर, सांगली नंतर ते आज दुपारी दोनच्या सुमारास कोल्हापुरात दाखल झाले. कोल्हापुरात दाखल होत असताना सर्वात आधी काल आगीमध्ये भक्षस्थानी पडलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी केली. यानंतर मिरजकर तिकटी येथे क्रांती दिनानिमित्त क्रांती स्तंभाला अभिवादन करत शांतता रॅलीला सुरुवात केली.
Vinesh Phogat: विनेशला रौप्यपदक मिळणार की नाही? आली मोठी अपडेट; लवादाने स्पष्टपणे सांगितले की…

यादरम्यान मोठ्या प्रमाणात मराठा समाजातील नागरिक सहभागी झाले होते. मिरजकर तिकटी येथून सुरू झालेली शांतता रॅली बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, माळकर तिकटी मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात दाखल झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मनोज जरांगे पाटील यांनी व्यासपीठावर येत मराठा समाजातील नागरिकांना संबोधित केले. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली असून गोडी गुलाबीत सांगतोय मराठा आरक्षण द्या,अन्यथा लोकसभेप्रमाण विधानसभेलाही पाडावं लागेल असा इशाराही राज्यकर्त्यांना दिला.मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मनोज जरांगे पाटील सोडत नसतो. मात्र सध्या विरोधी पक्षासह,सरकारने चारही बाजूने आपल्याला घेरलेले आहे. मात्र मी काय केलं हे मला कळत नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावं हीच आमची मागणी आहे. आपल्याला राजकारणकडे जायच नाही, मात्र आरक्षण दिले नाही तर पर्याय नाही. गेली 42 वर्ष झाले मराठा आरक्षण प्रश्न सुरू आहे.आरक्षण देत नाही. उलट आता आमच्यावर टीका करायला त्यांनी आमदारांच्या टोळ्या तयार केल्या आहेत. काही जणांना वाटत आहे मराठा समाजातील पोरं मोठी होऊ नयेत. म्हणून एकत्र या पक्ष आणि पक्षाच्या नेत्याला मोठा करू नका. ज्या नेत्याला आपण मोठ केलं तो नेता आता आपल्याबद्दल बोलायला तयार नाही, असे म्हणत सरकारवर त्यांनी टीका केली आहे.

सरकारला सद्बुद्धी द्यावी असं आईच्या चरणी साकडे

दरम्यान कोल्हापूर जिल्हाला महापुरानं वेढल आहे. शेतकऱ्यांचा मोठा नुकसान झालेला आहे अद्याप पंचनामे झालेले नाहीत. ज्या धरणानं कोल्हापूर जिल्ह्याच नुकसान होतयं त्या अलमट्टी धरणाकडं जरा बघा, दोन्ही सरकारने ने एकत्र येवून त्यावर मार्ग काढायला पाहिजे..सरकारने मार्ग काढला नाहीतर आपण एकत्र येवून काढू..आरक्षणाचा प्रश्न संपल्यानंतर तुम्ही साथ द्या धरणाचा प्रश्न हाती घेतो, असही जरांगे पाटलांनी म्हटले आहे.

दरम्यान सभेनंतर जरांगे पाटील यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती समाधी स्थळावर जाऊन अभिवादन केले तसेच करवीर निवासिनी अंबाबाईचे देखील त्यांनी दर्शन घेतले असून कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यात पुराचं संकट आला आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहवत नाही.सरकारला सद्बुद्धी द्यावी, असं आईच्या चरणी साकडे घातले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहे. सरकारने शेतकऱ्यांचे पंचनामे होऊन तातडीने नुकसान भरपाई द्यावी, असे साकडे घातल असल्याचं ही त्यांनी म्हटले आहे.

आरक्षणाच्या मुद्द्यावर दंगल व्हावे असे वाटते

दरम्यान जरांगे पाटील एका बाजूला शांतता रॅली काढत असताना दुसऱ्या बाजूला राजकीय नेत्यांकडून देखील आता रॅली काढायला सुरुवात झाली असून या संदर्भात बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी नेत्यांवर टीका केली. त्यांना निवडून येण्यासाठी ते रॅली काढत आहेत. त्यांना जनतेचे प्रश्न नको त्यांना खुर्ची पाहिजे आहे, असे ते म्हणाले. तसेच राज्यात सर्व जाती-धर्माची सत्ता येणार. पहिल्यांदाच मराठा समाज ताकतीने एकत्र आला आहे. 80 ते 85% मराठा कधीच एकत्र आलेला नव्हता. छोट्या छोट्या जातींचा कल्याण करण्याची हीच वेळ आहे. यामुळे गरिबांचे लाट यायला हवे, असे ही जरांगे पाटील म्हणाले आहेत. तर बांगलादेशमध्ये ज्या पद्धतीने आरक्षणाच्या मुद्द्यावर दंगल सुरू आहे. तसेच आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला आणि भुजबळ यांना दंगल व्हावे, असे वाटते. मात्र त्यांच्यासारखा इतका मग्रूरपणा महाराष्ट्रात होणार नाही. मात्र आरक्षण ओबीसीतूनच घेणार त्याशिवाय सुट्टी नाही, असेही जरांगे पाटील म्हणाले आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.