Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

५८ तासांनी गेम फिरवला, वरळी हिट अँड रन प्रकरणात ट्विस्ट, मिहीर शाहचा युरिन रिपोर्ट सांगतो…

12

मुंबई : वरळी हिट अँड रन प्रकरणातील २३ वर्षीय आरोपी मिहीर शाह याने ड्रिंक अँड ड्राईव्ह केले नसल्याचे समोर आले आहे. मिहीरच्या फॉरेन्सिक अहवालात त्याने मद्यपान करुन गाडी चालवल्याचा दावा फेटाळून लावण्यात आले आहे. फॉरेन्सिक अहवालानुसार, मिहीर शाहचे रक्त आणि लघवीचे नमुने अल्कोहोल निगेटिव्ह आले आहेत. म्हणजेच अपघाताच्या घटनेच्या वेळी तो दारुच्या नशेत नव्हता, असे स्पष्ट झाले आहे.

मिहीरला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी पोलीस प्रयत्नशील होते. मात्र घटनेच्या वेळी आरोपी मद्याच्या अंमलाखाली नसल्याचं स्पष्ट झाल्यामुळे शिक्षेचे स्वरुप बदलू शकते.

रविवार सात जुलै रोजी आलिशान बीएमडब्ल्यू कारची धडक देऊन ४५ वर्षीय दुचाकीस्वार महिला कावेरी नाखवा यांना जखमी केल्यानंतर मिहीरने त्यांना काही अंतरापर्यंत कारसकट फरफटत नेल्याचे समोर आले होते. तर त्यांचे पती प्रदीप नाखवा जखमी झाले. या घटनेनंतर जवळपास अडीच दिवसांनी म्हणजेच ५८ तासांनंतर त्याला अटक करण्यात आली होती.
Dead Body in Suitcase : मध्यरात्री मुलाला कुठे उठवता? साहेब, मूकबधिरांची मर्डर केस आहे; कर्तव्यदक्ष सातपुतेंमुळे खुनाला ‘वाचा’
अटक झाल्यानंतर लगेचच मिहीरची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. त्याचे रक्त आणि लघवीचे नमुने फॉरेन्सिक विश्लेषणासाठी पाठवण्यात आले होते.

मिहीर शहाचे वडील राजेश शहा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे पालघर जिल्ह्यातील उपनेते होते, परंतु नंतर त्यांना निलंबित करण्यात आले आहे. तेही दोन दिवस अटक टाळण्यात यशस्वी झाले होते.
Sindhudurg Accident : आई-बाबांनी गरिबीतून इंजिनिअर घडवला, नियतीने हिरावला; एसटीवर धडकून २५ वर्षीय तरुणाचा अंत
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिहीर शाहला घटनेच्या सुमारे ५८ तासांनंतर पकडण्यात आले, त्यामुळे या दरम्यानच्या काळात उशीर होऊन त्याच्या शरीरातील अल्कोहोलचा अंश निघून गेला असू शकतो.

नाखवा दाम्पत्याच्या स्कूटरला धडक दिल्यानंतर मिहीर शाहला महिला आपल्या कारच्या एका टायरमध्ये अडकल्याची जाणीव झाली होती, परंतु तरीही त्याने बेपर्वाईने गाडी चालवली. इतकंच नाही, तर रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांनी ओरडूनही तो थांबला नाही, असा दावा केला जात आहे.

मिहीर शहाने स्वत:ची ओळख लपवण्यासाठी दाढी आणि केस कापून अटक टाळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी ९ जुलै रोजी त्याचा माग काढत त्याला अटक केली. त्याला लपवण्यात गर्लफ्रेण्ड, आई, वडील, बहीण यांचा हात असल्याचं बोललं जातं.

मिहीर शहा याच्यावर सदोष मनुष्यवधाचा आरोप आहे, तर त्याचा चालक राजऋषी बिडावत यालाही अटक करण्यात आली आहे. दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.