Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Dombivali News : पार्सलमध्ये संदिग्ध वस्तू आढळल्याचा डॉक्टरला कॉल, पुढे असं काही घडलं की…डोंबिवलीत महिलेला ३० लाखांचा गंडा

11

ठाणे : मागील अनेक दिवसांत सायबर क्राईमच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. उच्चशिक्षित लोकही या ऑनलाईन फ्रॉडच्या जाळ्यात अडकून त्यांची आयुष्यभराची पुंजी गमावत असल्याच्या अनेक घटना आहेत. ऑनलाईन, सायबर फ्रॉडने आतापर्यंत अनेकांची मोठी फसवणूक होऊन लाखोंचं नुकसान झालं आहे. असंच एक प्रकरण डोंबिवलीमध्ये समोर आलं असून महिलेची मोठी फसवणूक झाली आहे.

सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्यासाठी डिजिटल, ऑनलाईन ट्रान्झेक्शनचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. त्याशिवाय कधी आधार कार्ड, कधी क्रिप्टो, तर कधी कुरिअर सर्विसच्या नावाने मोठी फसवणूक करत आहेत. अशाच प्रकारे एका डॉक्टर महिलेची फसवणूक झाली असून तिला ३० लाखांचा गंडा घालण्यात आला आहे.
Pune News : कुरिअर सर्विसमधून फोन, आधार कार्ड वापरल्याची माहिती, नंतर पोलिसांच्या मदतीचा बनाव; पुण्यात महिलेसोबत काय घडलं?

क्रिप्टोकरेन्सीच्या नावे मोठी फसवणूक

शुक्रवारी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यात राहणाऱ्या एका ४२ वर्षीय महिला डॉक्टरला एक फोन आला होता. क्रिप्टोकरेन्सी खरेदी करण्याचं आमिष दाखवून महिलेला ३० लाखांचा गंडा घालण्यात आला. मानपाडा पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं, की डोंबिवलीतील खोनी इथे राहणाऱ्या पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केली. २ ते ६ ऑगस्ट या काळात तिची फसवणूक झाल्याचं तिने सांगितलं.

महिला डॉक्टरला एक कॉल आला, ज्यात दावा केला होता की २४ जुलै रोजी त्यांच्याकडून थायलंडमध्ये पाठवलेल्या पार्सलमध्ये संदिग्ध वस्तू आढळल्या आहेत. कॉल करणाऱ्याने खोटं सांगत पार्सलमध्ये तीन पासपोर्ट, तीन सिम कार्ड आणि एमडी ड्रग्ससह इतर काही वस्तू आहेत.
Vasai News : वसई-विरारमध्ये उभारले जाणार ४ ओव्हरब्रिज, वाहतूककोंडी सुटणार; कुठून कसा असेल मार्ग?

कशी झाली फसवणूक?

महिलेला खोटा फोन कॉल आल्यानंतर तिला संदिग्ध वस्तू आढळल्याचं सांगितलं. त्यानंतर तिला मोबाईलमध्ये एक अॅप डाऊनलोड करण्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर ३० लाख ८६ हजार ५३५ रुपयांची क्रिप्टोकरेन्सी खरेदी करण्याचं आमिष दाखवण्यात आलं. त्यानंतर महिलेने तिच्या विविध बँक खात्यांमधून पैसे ट्रान्सफर केले. आता पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

पुण्यात महिलेला २५ लाखांचा गंडा

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका महिलेलाही २५ लाखांचा गंडा घालण्यात आला होता. तिला कुरिअर सर्विसमधून बोलत असल्याचं सांगत कॉल आला. त्यानंतर तुमचं एक पार्सल कस्टम विभागाने पकडलं असल्याचं सांगण्यात आलं. पार्सलमध्ये अमली पदार्थ असल्याचं तिला सांगण्यात आलं. मात्र महिलेने मी कोणतंही पार्सल पाठवलं नसल्याचं म्हटलं. त्यानंतर तिला आणखी फसवत हा कॉल नार्कोटिक्स डिपार्टमेंटला ट्रान्सफर करण्यात येईल त्यानंतर त्यांच्याकडून क्लिअरन्स सर्टिफिकेट घेण्याचं महिलेला सांगण्यात आलं आणि इथेच मोठा फ्रॉड झाला आणि महिलेची २५ लाखांची फसवणूक झाली.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.