Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Nashik News: खत्रींकडे NMRDAचे आयुक्तपद; सतीश खडके प्रतीक्षेत, भाजपशी संघर्षात शिंदे गटाची सरशी

15

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एनएमआरडीए) आयुक्तपदी नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिक महापालिका आयुक्तपदावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटात सुरू असलेल्या चढाओढीत शिंदे गटाने अखेर बाजी मारल्याचे चित्र आहे. महापालिका आयुक्तपदावर खत्री यांच्या नियुक्तीसाठी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपच्या आमदारांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. परंतु, शिंदे गटाने त्यांच्या नावाला विरोध केल्याची चर्चा होती. त्यामुळे पालिका आयुक्तपदावर डॉ. अशोक करंजकर कायम राहतात की नव्या आयुक्ताची नियुक्ती होते, याकडे आता सर्वांच्या नजरा लागून आहेत.

डॉ. करंजकर यांची २० जुलै २०२३ रोजी नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. वर्षभराचा कालावधी उलटत नाही तोच त्यांच्या बदलीची चर्चा आहे. त्यात गेल्या महिन्यात डॉ. करंजकर यांनी आपल्या कामाची गती वाढवली होती. प्रलंबित फायलींचा निपटारा जोमाने होत असल्यामुळे डॉ. करंजकर यांची बदली होणार, यावर शिक्कामोर्तब झाले होते. करंजकर यांच्या जागी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या नावाची चर्चा आहे. त्यात भाजपच्या आमदारांनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ‘आयएएस’ दर्जाचा अधिकारी हवा असा हट्ट धरला होता. तर, आयुक्तपदासाठी खत्री यांचे नाव महाजन यांच्यासह भाजपच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे सुचवले होते. त्यात डॉ.करजंकर यांनी अचानक वादग्रस्त ५५ कोटींच्या भूसंपादन प्रकरणांना चालना दिली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांची कानउघडणी केल्यानंतर डॉ. करंजकर १५ दिवसांच्या रजेवर गेले आहेत. त्यामुळे शुक्रवारी आयुक्तपदावर खत्री यांची नियुक्ती होईल अशी चर्चा असताना, खत्री यांची ‘एनएमआरडीए’च्या आयुक्तपदावर नियुक्ती झाल्याचे आदेश निघाले. वर्षभरापूर्वी सतीश खडके यांची महानगर आयुक्तपदी नियुक्त करण्यात आली होती. खडके यांची प्रशासकीय श्रेणी उन्नत करण्यात आली असून, त्यांना अद्याप पदभार दिलेला नाही. त्यामुळे खत्रींची पालिकेतील एंट्री लांबणीवर पडली आहे.
‘सिंहस्था’चा फुगवटा ओसरला! आराखडा १५ हजार कोटींवरुन साडेआठ हजार कोटींवर; अजून काटछाट करण्याचे निर्देश
पालिकेतील वर्चस्वावरून संघर्ष

महायुतीच्या सरकारमध्ये भाजप-शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरूनही संघर्ष सुरू आहे. नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी जलज शर्मा यांच्या नियुक्तीसाठी भाजपच्या नेत्यांनी प्रयत्न केले. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंकडे नगरविकास मंत्रीपद असल्यामुळे महापालिका आयुक्तपदाचे वाटप शिवसेना शिंदे गटाकडे गेले आहे. महापालिका आयुक्तपदावर खत्री यांची वर्णी लावावी यासाठी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपच्या आमदारांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. परंतु, भाजपच्या इच्छेने आयुक्त दिल्यास पालिकेवरील आपले नियंत्रण जाईल, अशी भीती पालकमंत्री दादा भुसेंसह शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांना वाटत होती. त्यामुळे शिंदे गटाकडून खत्री यांच्या नावाला विरोध करण्यात आल्याची चर्चा होती.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.