Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘आताच सांगतोय, अशीच परिस्थिती राहिली तर विधानसभेला फार मोठी अडचण होईल’

11

परभणी(धनाजी चव्हाण): मागील दीड वर्षापासून राज्यामध्ये महायुतीचे सरकार आहे. पण या दीड वर्षाच्या काळामध्ये मलाच नव्हे तर भाजपच्या कोणत्याच पदाधिकाऱ्याला विकास निधी मिळाला नाही. एक रुपयाचाही विकास निधी न मिळाल्याने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी जोमाने कामही केले नाही. आता देखील जिल्हा नियोजन समितीचे 375 कोटी वितरित झाले पण यामध्येही भाजपच्या कार्यकर्त्यांना एक रुपयाचा विकास निधी मिळाला नाही. अशीच परिस्थिती राहिली तर विधानसभेला फार मोठी अडचण होईल असे मत व्यक्त करीत भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांनी विकास निधीवरून माजी मंत्री रावसाहेब दानवे यांच्या समोरच खंत व्यक्त केली.

भारतीय जनता पक्षाचा परभणी जिल्हास्तरीय कार्यकर्त्यांचा मेळावा आज संपन्न झाला. या जिल्हास्तरीय बैठकीमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर आमदार मेघना बोर्डीकर, जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, शहर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख, आनंद भरोसे, विजय वरपूडकर, सुरेश भुमरे, मंगला मुदगलकर, विठ्ठल रबदाडे, रंगनाथ सोळंके यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
Reetika Hooda: रितिका हुड्डाची लढत ‘ड्रॉ’ तरी पराभूत ठरवले, पाहा नेमके काय घडले; भारताला अजून एक पदक जिंकण्याची संधी

पुढे बोलताना ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे म्हणाले की मी मागील दोन वर्षापासून भाजपचा जिल्हाध्यक्ष आहे. राज्यामध्ये मागील दीड वर्षापासून महायुतीचे सरकारही आहे. पण राज्यपातळीवरून आणि जिल्हा पातळीवरून माझ्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कसल्याही प्रकारचा विकास निधी दिला जात नाही. पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. जुन्या कार्यकर्त्यांसह नव्या कार्यकर्त्यांच्या देखील पक्षाकडून मोठ्या प्रमाणावर अपेक्षा आहेत. पण या कार्यकर्त्यांचे समाधान होत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठी खंत देखील आहे.
विधानभवनावर विदर्भाचा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न ; पोलिसांनी डाव उधळला, दीडशे महिलांसह ३५० आंदोलनकर्ते ताब्यात

जिल्हाध्यक्ष हा जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा पालक असतो. त्यामुळे माझी इच्छा होती की माझ्या कार्यकाळात कार्यकर्त्यांना बळ देता येईल. पण पक्ष निधीच न मिळाल्याने कार्यकर्त्यांचे समाधान मात्र करता आले नाही. नुकताच जिल्हा नियोजनचा 370 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात येत आहे. पण या निधीमध्ये देखील जिंतूर विधानसभा मतदारसंघ वगळला तर अन्य मतदार संघातील कार्यकर्त्यांना एक रुपयाचाही विकास निधी मिळाला नाही. ही बाब जाहीरपणे मांडायची नव्हती पण त्याशिवाय पर्याय नवता असेही संतोष मुरकुटे म्हणाले.

एकंदरीतच माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्यासमोरच भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष असलेल्या संतोष मुरकुटे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भावना त्यांच्या मनातली खदखद व्यक्त केली. त्यामुळे भाजपमध्ये सर्वकाही अलबेला असल्याचे दिसून येत आहेत.

जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघ भाजपला सोडवून घ्या -आनंद भरोसे

परभणी जिल्ह्यामध्ये भाजपची टाकत मोठी आहे लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपसाठी हा मतदार संघ सोडून घ्यावयाचा होता पण तळजळीमध्ये तो राष्ट्रीय समाज पक्षाला सोडण्यात आला. लोकसभा निवडणुकीत भाजपने महायुतीच्या उमेदवाराचे मन लावून कामही केले. पण आता विधानसभेला परभणीच्या चारही विधानसभा मतदारसंघातून भाजपचाच उमेदवार उभा करावा अशी मागणी एक मुखाने भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मांडली. तसा प्रस्तावच भाजपचे माजी शहर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी ठेवला. भाजप पदाधिकाऱ्यांनी असाच रेटा लावला तर महायुतीमध्ये देखील मतदारसंघावरून ठिणगी पडू शकते असे दिसून येत आहे. एकीकडे महायुती म्हणून तीन पक्ष एकत्र येत असताना जिल्हास्तरावर मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांकडून स्वबळाचा नारा देण्यात येत आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.