Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सभेआधीच मनसेचा राडा! उद्धव ठाकरेंचा सुपारीवरुन ‘तो’ भन्नाट विनोद सारेच खळखळून हसले..

11

मुंबई : राज्यात विधानसभेआधीच दोन ठाकरे बंधू मधील वाद टोकाला जाण्याची शक्यता दिसत आहे. काल मराठवाडा दौऱ्यावर असताना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपारी फेकून आंदोलन केले तर आज त्याच आंदोलनावरुन राज ठाकरे यांनी थेट शिवसेना उबाठा गटाला नादाला लागू नका असा इशारा दिला होता. पण आता राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर मनसे चांगली एक्टिव्ह मोडवर गेली आहे. ठाण्यात आज उद्धव ठाकरे यांच्या सभास्थळी राज ठाकरेंच्या मनसैनिकांनी मोठा गोंधळ केला. यावरच उद्धव ठाकरेंनी सुद्धा भाषणात अगदी मोजक्या शब्दात शालजोडी मारत टोमणा मारला.

उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर काय

उद्धव ठाकरे यांच्या सभेआधीच राज ठाकरेंच्या मनसैनिकांनी गोंधळ घातला होता त्यामुळे नेमके उद्धव ठाकरे काय बोलणार याकडेच सर्वाचे लक्ष होते अशातच ठाकरेंच्या तीन विधानाचा मात्र राज ठाकरे यांच्याकडे थेट रोख होता. यातील पहिले विधान म्हणजे निवडणुकीवर लक्ष द्या याला त्याला उत्तर देण्यात वेळ वाया घालवू नका. २०१२ च्या निवडणुकींची आठवणीना उजाळा देत म्हणाले त्यावेळी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब म्हणाले होते आपण कसे जिंकू पण फक्त ‘एक लाईन करुन दाखवले’ याच विधानावर आम्ही जिंकलो असे ठाकरे म्हणाले. याच लाईनवर तेव्हा मनसे, काँग्रेस आणि राष्टवादीने टीका केली होती.
MNS VS Shivsena : उद्धव ठाकरेंच्या गाडीवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी फेकले शेण, ठाण्यात वातावरण तापले

ठाकरेंचे दुसरे विधान होते हल्ली सारेच विधानसभे आधी महाराष्ट्र यात्रा काढतायत, तुम्ही कोणी भगवे, कोणी गुलाबी जॅकेट घालतंय असे, मी त्यांना सांगेन तुम्ही थेट तीर्थयात्रेला जा, असा टोला ठाकरेंनी लगावला. तर एकनाथ शिंदे यांच्यावर बोलताना ठाकरेंनी शिंदे यांच्या बोलण्याचा भाषेबद्दल विधान केले शिंदे तोंडात सुपारी धरल्यालासारखे ये जो है ना वो जो है असे बोलतात असे म्हणत ठाकरेंनी शिंदेंना डिवचले. म्हणून.. हा शब्द इतका तानला जातो की जसे काही पोट साफ झाले नाही असा मिश्कील टोला ठाकरेंनी लगावला, पुढे शिंदेंच्या हिंदी बोलण्यावरुन तोंडातली सुपारी फेका आणि नीट बोला असा ठाकरेंनी टोला लगावला हे बोलताच सारे शिवसैनिक हसू लागले आणि सभागृहात सुपारी सुपारी ओरडू लागले. प्रत्यक्ष मात्र राज ठाकरेंवर टीका करणे उद्धव ठाकरेंनी टाळलेले दिसले.

मनसेचा सभास्थळी राडा

राज ठाकरेंचा ताफा अडवून त्यांच्यावर सुपारी टाकल्याच्या घटनेला आता मनसैनिकांनी जशास तसं उत्तर दिलं असून उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर आता मनसेच्या सैनिकांनी शेण टाकलं आहे. त्यानंतर मनसैनिक आक्रमक होत थेट उद्धव ठाकरेंचा कार्यक्रम सुरू असलेल्या ठाण्यातील रंगायतनमध्ये घुसले. त्यामुळे या ठिकाणी आता मोठा गोंधळ झाला आहे. मनसेचे ५० ते ६० कार्यकर्ते याच ठिकाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला. त्यामध्ये महिला कार्यकर्त्यांची संख्या मोठी होती. मनसेचे कार्यकर्ते ठाण्यातील रंगायतनमध्ये घुसले आणि त्यांनी शिवसेनेचा बॅनरही फाडला. या प्रकारानंतर शिवसैनिकही त्याठिकाणी जमा झाले आणि गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.