Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

माझ्या नवऱ्याला चुकीचे मेसेज करू नको, सुप्रिया सुळे यांची हॅकरला विनंती

7

दीपक पडकर, दौंड: बारामतीच्या लोकप्रिय खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन आणि व्हॉट्सअप आज अचानक हॅक झाले. यासंबंधीची माहिती त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट करुन दिली आहे. माझा फोन माझ्या बरोबरीने दुसरे कोणीतरी चालवत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. फोन हॅक झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मेसेज करायला लावला. त्यांच्याशी दुसराच व्यक्ती बोलत असल्याचा गंभीर प्रसंग सुप्रिया सुळे यांनी भर सभेत सांगितला.

खासदार सुप्रिया सुळे आज दौंड येथील पाटसमध्ये शिवस्वराज्य यात्रेनिमित्त आल्या होत्या. यावेळी त्यांनी मोबाईल हॅक झाल्याची माहिती भर सभेतच दिली. त्याचवेळी राजकारणाची पातळी घासरत असल्याची खंत व्यक्त केली.
Supriya Sule: कोणीही मला मेसेज किंवा फोन करून नये; सुप्रिया सुळेंचा मोबाईल हॅक

मोबाईल हॅक, जयंत पाटील यांचा मेसेज, दुसरा कुणीतरी चॅट करतोय!

सुप्रिया सुळे म्हणाल्या, फोन हॅक झाल्याचे माझ्या लक्षात आल्यानंतर माझे व्हॉट्सअॅप सुरू होत नव्हते. म्हणून मी जयंत पाटील यांना मेसेज करायला सांगितला. तेव्हा त्यांनी ‘नमस्कार’ असा मेसेज केला. त्यावेळी मी देखील त्यांना रिप्लाय दिला. त्यानंतर फोन स्वीच ऑफ करून सिम बाजूला काढले. त्यानंतर पुन्हा मी जयंत पाटील यांना मेसेज करण्यास सांगितले. त्यावेळी फोन हॅक करणाऱ्याने ‘तुम्ही कुठे आहात?’ असा मेसेज केला. दुसऱ्या एकाने ‘नमस्कार ताई’ असा मेसेज केला असता, त्यांनाही नमस्कार ताई असा मेसेज गेला. एकाने माझ्या नंबरवर मेसेज केला, ‘आम्ही तुमची वाट बघत आहोत’ त्यावर पुन्हा मेसेज आला की, ‘आय विल कॉल यू लेटर….’
Sharad Pawar: कडू, काकडे मोदीबागेत; शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

माझा फोन बंद असताना, सिम काढलेले असतानाही माझ्या फोनवरून कुणीतरी दुसराच मेसेज करतोय, हे मला उमगले. पण तो व्यक्ती कोण आहे, हे अद्याप समजायला मार्ग नाही. याबाबत मी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे, अशा प्रसंग सुप्रिया सुळे यांनी पाटसच्या सभेत सांगितला. त्याचवेळी राजकारणाची पातळी घसरत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
Social Media Account Safety: तुमचे सोशल मीडिया अकाऊंट करा हॅकर्स पासून सुरक्षित; ‘ही’ युक्ती ठरेल उपयुक्त

माझ्या नवऱ्याला चुकीचे मेसेज करू नको

सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी कोणावरही आरोप करत नाही. माझा फोन कुणी हॅक केला, हे मला माहिती नाही. फोन हॅक होण्याचे महाराष्ट्रात प्रकार अनेक दिवसांपासून सुरू आहेत. त्याचा मी एक बळी आहे. माझा फोन हॅक केला. काही हरकत नाही. कारण माझ्या फोनमध्ये लपविण्यासारखे काहीच नाही. मात्र माझ्या नवऱ्याला चुकीचे मेसेज करू नको, अशी विनंती सुळे यांनी हॅकरला केली.
Sharad Pawar: प्रवीण माने पवारांच्या पक्षात, आप्पासाहेब जगदाळेंचं काय? इंदापुरात कोणाची वर्णी लागणार?

माझा पक्ष नेला, चिन्ह नेलं, अजून काय काय नेतील याची गॅरंटी नाही

मला आश्चर्य वाटतंय की, माझा फोन हॅक कसा झाला? कोणी केला? कशासाठी केला? मला काही माहिती नाही. याबाबत मी एसपींशी बोलले असून त्यांनी तशी यंत्रणा राबविली आहे. माझ्या फोनमधून काही कोणाला माहिती हवी असती तर दिली असती. फोन त्यांच्याकडे दिला असता आणि काही करायचे ते करा, असे म्हटले असते. त्यामुळे मला आता या सर्वांची सवय झाली आहे. माझा पक्ष नेला, चिन्ह नेलं, अजून काय काय नेतील.. याची गॅरंटी नाही. तुम्ही सर्व काही घेऊन जाऊ शकता. मात्र माझे मायबाप मतदार घेऊन जाऊ शकत नाही, हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

राजकारणाची पातळी खालावते आहे

कोणी काय करेल हे सांगता येत नाही. तुम्ही सर्वांनी त्यावर मेसेज करून पहा. काय मागायचे ते मागा, पैसे मागा काहीही मागा.. बघुयात काय उत्तर येतंय.. असे म्हणत त्यांनी राजकारणाची पातळी खालावत असल्याची खंत व्यक्त केली.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.