Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

भाजपच्या ८० ते ९० जागा येतील! सर्व्हेतील ‘जर-तर’मुळे कोंडी; विचित्र पेचानं मिशन अवघड?

11

मुंबई: लोकसभा निवडणुकीत राज्यात सपाटून मार खाणाऱ्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षानं आता विधानसभा निवडणूक जिंकून राज्यातील सत्ता कायम ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. सर्वेक्षणाच्या माध्यमातून जनमानसाचा कानोसा घेण्याचा प्रयत्न पक्षाकडून सुरु आहे. लोकसभेला भाजपनं बहुतांश मतदारसंघांमध्ये विद्यमान खासदारांना पुन्हा संधी दिली. पण दोन खासदार वगळता अन्य सगळ्यांचाच पराभव झाला. त्यातून धडा घेत आता विधानसभेला भाजप नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या तयारीत आहे.

विधानसभा निवडणुकीला सामोरं जाताना राज्य भाजपचे नेते काहीसे कोंडीत सापडले आहेत. काही आमदारांना तिकिटं कशी नाकारायची असा प्रश्न त्यांच्या पुढे आहे. भाजपनं नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणातून महत्त्वाची बाब समोर आली. पक्षानं अनेक मतदारसंघांमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची गरज असल्याचं सर्व्हे सांगतो. त्यामुळे भाजपला अनेक आमदारांची तिकिटं कापावी लागतील.
Navi Mumbai Murder: उरण हत्याकांडात दाऊद शेखविरोधात पोलिसांच्या हाती महत्त्वाचा पुरावा; तपासाला गती मिळणार
२०१९ मध्ये भाजपनं विधानसभेच्या १०५ जागा जिंकल्या होत्या. यंदा भाजप १५० हून अधिक जागा लढवण्याच्या तयारीत आहे. अनेक आमदारांच्या जागी नवे चेहरे दिल्यास पक्षाला ८० ते ९० जागा मिळतील, असं सर्व्हे सांगतो. सध्याच्या घडीला राज्यात ६ पक्ष आहेत. त्यामुळे विद्यमान आमदारांचं तिकीट कापल्यास ते अन्य पक्षात जाण्याची किंवा त्यांच्या जागी तिकीट देण्यात आलेल्या उमेदवाराला पाडण्यासाठी मोर्चेबांधणी करण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास भाजपची डोकेदुखी वाढू शकते.
Bihar News: युरेका! युरेका!! ‘गायब’ झालेली तब्बल ११३ एकर जमीन सापडली; सर्वाधिक जमीन CMच्या जिल्ह्यात
लोकसभेला काही जागांवर मविआ आणि महायुतीत अगदी घासून संघर्ष झाला. बीड, वायव्य मुंबईसारख्या जागांवर अतिशय कमी मतांच्या फरकानं निकाल लागला. विधानसभेलादेखील अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे अवघ्या काही मतांनी निकाल फिरु शकतो. याची जाणीव असल्यानं तिकिटं कापणं भाजपसाठी आव्हानात्मक बनलं आहे.

गेल्या महिन्याभरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्यानं संघाच्या पदाधिकाऱ्यांशी बैठका घेऊन समन्वय राखत आहेत. गेल्याच आठवड्यात झालेल्या बैठकीत त्यांनी विधानसभेला भाकरी फिरवण्याचे संकेत दिले. लोकसभेला अनेक विद्यमान खासदारांना संधी दिली. पण त्यातील केवळ दोनच विजयी झाले, असं फडणवीस म्हणाले. त्यामुळे विधानसभेला भाजप अनेक आमदारांना नारळ देऊन त्यांच्या जागी नव्यांना संधी देणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.