Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

महायुतीचा पहिला उमेदवार जाहीर, अजितदादांची थेट घोषणा, भाजप इच्छुकाच्या मनसुब्यांना सुरुंग

9

नयन यादवाड, कोल्हापूर : राज्यातील सर्वांचे लक्ष कोल्हापूरमधील कागल विधानसभा निवडणुकीकडे लागलेले आहे. आजपर्यंत अनेक चढउतार आले, मात्र कागलकरांनी हसन मुश्रीफ यांच्या मागची ताकद कमी केली नाही. या निवडणुकीमध्ये देखील आपण सर्वांनी महायुतीचे उमेदवार म्हणून हसन मुश्रीफ यांना इतक्या उच्चांक मतांनी निवडून द्या की समोरच्याला धडकी भरली पाहिजे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीचे पहिले उमेदवार म्हणून हसन मुश्रीफ यांचे नाव जाहीर केले आहे. यानंतर मुश्रीफांचे कट्टर विरोधक असलेले भाजप नेते समरजीत सिंह घाटगे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे.

कागलमधून महायुतीचे उमेदवार हसन मुश्रीफच

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनीही मोर्चेबांधणीला सुरुवात केले आहेत. अद्याप जागावाटप झालेलं नसलं तरी महायुतीमध्ये विद्यमान आमदारालाच पुन्हा उमेदवारी असा फॉर्मुला असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. अशातच राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कागल विधानसभा मतदारसंघात पारंपरिक कट्टर विरोधक असलेले हसन मुश्रीफ आणि भाजप नेते समरजीत सिंह घाटगे दोघेही महायुतीमध्ये असल्याने उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

हसन मुश्रीफ यांनी मी अजून एक निवडणूक लढवणार आहे असे म्हणत यापूर्वीच आपली उमेदवारी जाहीर केली होती. मात्र काल कागलमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या विकास कामांचा शुभारंभ आणि जाहीर मेळाव्यात अजित पवार यांनी हसन मुश्रीफ हे महायुतीचे उमेदवार असतील असे जाहीर केले आहे.
Avinash Salve : ठाकरे गटाच्या नेत्याने शिवबंधन सोडलं, काँग्रेसमध्ये गोपनीय प्रवेश, पुण्यात खळबळ
शिवाय आजपर्यंत अनेक चढ-उतार आले मात्र तुम्ही हसन मुश्रीफ यांच्या मागची ताकद कमी केली नाही. हसन मुश्रीफ यांनी तुमच्यासाठी इतकी कामे केली आहेत. आता तर ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. आज संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष कागलच्या निवडणुकीकडे आहे. आपण सर्वांनी असा उच्चांक करून दाखवा, की समोरच्याला धडकी भरली पाहिजे इतक्या बहुमताने महायुतीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांना निवडून द्या असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे. यामुळे महायुतीच्या कोणत्याही घटक पक्षाने जाहीर केलेली ही पहिलीच उमेदवारी आहे.

मी केवढा विकास निधी आणलं त्यांची चर्चा गुवाहाटीमध्ये झाली

कागल येथे पार पडलेल्या जाहीर मेळाव्यात हसन मुश्रीफ यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. नेहमीप्रमाणे याही मेळाव्याला कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली. यावेळी बोलताना हसन मुश्रीफ यांनी देखील गेल्या 25 ते 30 वर्षाच्या राजकारणात मी विकास कामाचं डोंगर उभं केलं. हसन मुश्रीफ यांनी किती निधी आणला असे अनेक जण विचारतात मी किती निधी आणलो हे सांगायचे म्हणले तर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत जो उठाव केला आणि त्यानंतर आमदारांना घेऊन ते गुवाहाटीला गेले त्यावेळी तेथील आमदार माध्यमांना प्रतिक्रिया देताना हसन मुश्रीफ यांनी सर्वात जास्त निधी नेला त्यामुळे आम्ही उठाव केला असे म्हणत होते. म्हणजेच मी केवढा विकास निधी आणलं त्यांची चर्चा गुवाहाटी मध्ये झाली.

विधानसभा निवडणुकीच्या वेळेस मी पुस्तक काढणार ते बघून विरोधकांचे डोळे पांढरे होतील. समोर कोण उभ राहणार आहे. हे माहीत नाही पण त्याला हरवण्याची तयारी मी गेल्या सहा महिन्यापासून केली आहे असे मुश्रीफ म्हणाले. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनीही मला पाठिंबा दिलाया या बद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. त्यांच्या पाठिंब्यामुळे मला 100 हत्तींचं बळ मिळालं आहे. मी कालही तुमचा होतो, आज ही आहे, उद्या ही राहणार शेवटच्या श्वासापर्यंत राहणार, असे म्हणत हसन मुश्रीफ यांनी आमदार होण्याचा निश्चय केला.
Rajya Sabha Election : राज्यसभेसाठी भाजपकडून नाव फिक्स, तर काँग्रेसमधून आलेला नेता अजितदादांचा उमेदवार?

समरजीतसिंह घाटगे यांच्या भूमिकेकडे आता लक्ष

महायुतीमध्ये अजित पवार गट आणि हसन मुश्रीफ सामील झाल्यापासून मुश्रीफ यांचे कट्टर विरोधक भाजपचे नेते समरजीत घाटगे अस्वस्थ होते. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर देखील नाराजी दर्शवली होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची समजूत काढल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये थांबत कागलमधून निवडणुकीची तयारी सुरू केली. गेल्या निवडणुकीत अपक्ष लढूनही समरजीत घाटगेंनी जवळपास 90 हजार मतदान घेतलं होतं. कागलची जागा राष्ट्रवादीला जाणार की भाजपला यावरून सातत्याने चर्चा सुरू होत्या. गेल्या काही दिवसांपासून समरजीत सिंह घाटगे यांना शरद पवार गटाकडून उमेदवारीसाठी ऑफर देण्यात येत असल्याच्या चर्चाही सुरू आहेत. मात्र आता अजित पवार यांनी थेट हसन मुश्रीफ यांची उमेदवारी जाहीर केल्याने समरजीत घाटगे काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.