Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Lajvarta Ratna : सोनेरी आभा असणारे हे रत्न आहे चमत्कारी, मानसिक ताणतणाव त्वरित दूर करी !

10

Importance of Lajvarta Ratna: ज्योतिषशास्त्रात नवग्रह आणि नवरत्न याबद्दल माहिती सांगितलेली आहे. आपल्यापैकी अनकेजण नवरत्न परिधान देखील करतात किंवा त्या ग्रहानुसार रत्न परिधान करतात. तुमच्या जन्मकुंडलीत एखादा ग्रह कमकूवत किंवा अशूभ असेल तर त्या ग्रहाला अनुकूल असणारे रत्न परिधान करण्यासाठी सांगितले जाते. आज आपण जाणून घेणार आहोत लाजवर्त या रत्नाबद्दल. आता तुम्ही म्हणाल हे कोणते नवीन रत्न आहे का? लाजवर्त रत्न म्हणजे नक्की कोणते रत्न? ते परिधान केले तर काय फायदा होतो? ते जाणून घेऊया.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Lajvarta Ratna : सोनेरी आभा असणारे हे रत्न आहे चमत्कारी, मानसिक ताणतणाव त्वरित दूर करी !
Benefits of Lajvarta Ratna : प्राचीन ग्रंथात नीलम रत्नाचे वर्णन आढळते, प्रत्यक्षात हा नीलम नसून ते लाजवर्त रत्न आहे. नीलम रत्नाची सगळीकडे चर्चा असते. एक मुल्यवान रत्न म्हणून आपण नीलम रत्नाकडे पाहतो. या नीलम रत्नाच्या उपश्रेणीत लाजवर्त रत्न येते. नीलम रत्नाच्या खालोखाल लाजवर्त रत्नाचे स्थान आहे, याचा अर्थ लाजवर्त रत्न कमी श्रेष्ठ आहे असे समजू नका. सध्या या लाजवर्तचा वापर कमी होत असला तरी याचे फायदे अनेक आहेत तसेच हे एक चमत्कारीक रत्न म्हणूनही ओळखले जाते.

कशी झाली लाजवर्त रत्नाची उत्पत्ती?

पौराणिक कथेनुसार बळी राजाच्या केसांच्या बटेपासून लाजवर्तची उत्पत्ती झाली. बळीराजाच्या मुकूटाचा अंश देखील लाजवर्त रत्नात उतरलेला आहे. म्हणून तर जेव्हा तुम्ही लाजवर्त रत्न पाहता तेव्हा ते निळ्या रंगाचे असून त्यावर सोनेरी रंगाच्या हलक्या छटा दिसतात. 84 रत्नांमध्ये लाजवर्तचा समावेश आहे. पौराणिक कथा काहीही असल्या तरी वैज्ञानिक दृष्टिकोनातून लाजवर्तची रचना सल्फर युक्त सोडियम आणि अ‍ॅल्युमिनिअम सिलिकेटपासून झालेली आहे.

अपारदर्शक आणि वजनाला जड

लाजवर्त रत्न तुम्ही पाहिले तर तुम्हाला समजेल हे रत्न अपारदर्शक आहे. गडद निळा रंग आणि त्यामध्ये थोडा काळसरपणा असतो. वजनाने थोडे जड असणारे हे रत्न चिली, सैबेरिया, अफगाणिस्तान,अर्जेंटिना, तिबेट येथे सापडते. रशियातील वैकाल सरोवराच्या आसपास लाजवर्त सापडतो. अफगाणिस्तान आणि अर्जेंटिना येथील लाजवर्त महागडे असून फ्रान्समध्ये रसायनांचा वापर करून वैज्ञानिक पद्धतीने लाजवर्त रत्न तयार केले जाते. त्यामुळे खरा लाजवर्त कोणता हे ओळखण्यासाठी एखाद्या रत्नपारखीची मदत घ्यायला हवी

लाजवर्तचे औषधी उपयोग

लाजवर्त रत्नाचा वापर फक्त अशुभ ग्रहाचा प्रभाव कमी करणे एवढाच नाही तर यामध्ये अनेक औषधी गुण आहेत. याचा वापर मुतखडा, किडनीचे आजार, त्वचेची अनावश्यक वाढ, डोकेदुखी, पित्त प्रकोप शांत करणे यासाठी होतो. लहान मुलांतील हाडांचा रिकेटस आजारातही हा मणी लाभदायक आहे. तसेच शरीरात नवीन रक्ताचा संचार वाढवून कांती सतेज करण्यात मदत करतो. याशिवाय कावीळ, क्षय रोगांचा नाश करणे आणि हृदयाची शक्ती वाढवणे यातही या लाजवर्त लाभदायक आहे. शुद्ध हरपणे, त्वचेचे आजार यासाठी लाजवर्त लाभदायक आहे. जर एखाद्या व्यक्तीला काही अ‍ॅलर्जी असेल तर अस्सल लाजवर्त धारण केला पाहिजे, हळूहळू आजार बरो होतो.

लाजवर्तचा ज्योतिषीय उपयोग

लाजवर्तमध्ये अनेक ज्योतिषीय गुण आहेत. उपरत्न म्हणून लाजवर्त धारण केले तर शनी शांत होतो आणि वाईट फलांचा प्रभाव कमी होतो. जर हा मणी मुलांनी गळ्यात धारण केला तर मुलांच्या मनातील भीती दूर होते. तसेच हा मणी धारण करणाऱ्यांना त्वचेवरील फोड, मुरूम यापासून दिलासा मिळतो. एका तरुणीच्या चेहऱ्यावर अत्याधिक मुरूम होते, त्यामुळे लग्नात अडचणी येत होत्या. तिला लाजवर्त आणि चंद्रमणी धारण करण्यास देण्यात आला. त्यानंतर या महिलेच्या मनात देवाबद्दल आस्था निर्माण झाली आणि तीन महिन्यात तिचे ७५ टक्के मुरूम कमी झाले आणि पाचव्या महिन्यात तिचा विवाह निश्चित झाला.

सोनेरी मनमोहक आभा असणारा लाजवर्त

लाजवर्त हे सध्याच्या काळात उपरत्न म्हणून ओळखले जात असले तरी ते एक मौल्यवान रत्न आहे. तुम्ही लाजवर्त खरेदी करताना तो अस्सल म्हणजे खरा आहे की नाही याची खात्री नक्की करायला हवी. लाजवर्त अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेटमध्ये परिधान केला जातो. लाजवर्तच्या पृष्ठभागावर सोनेरी छटा असल्यामुळे तो चारी बाजूंनी चमकतो. याची सोनेरी आभा मनमोहक असते. या सोनेरी आभामुळे हे रत्न अत्यंत तेजस्वी दिसते. लाजवर्तला अंगार मणीही म्हटले जाते. लाजवर्त दुर्बिणीतून दहापट मोठा करून पाहिला तर यात तांब्यासारखे कण दिसतात. या रत्नाचा वापर अंगठी, लॉकेट, कर्णफूल किंवा माळ बनवण्यासाठीही होतो.

कसा आणि कधी परिधान करावा?

भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार आठ ते सव्वा दहा रत्ती वजनाचा लाजवर्त परिधान करायला हवा. हे रत्न चांदीमध्ये परिधान केले जाते तसेच शनिवारी लाजवर्त घालावा असेही सांगतात. जर लाजवर्तची अंगठी केली तर मधल्या बोटात ती परिधान केली जाते. लाजवर्त धारण करण्यापूर्वी मोहरी किंवा तिळाच्या तेलात पाच तास बुडवून ठेवा. यानंतर शनिदेवाच्या बीजाच्या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. तसेच संध्याकाळी लाजवर्त परिधान करा.

लाजवर्त कोणी परिधान करावा?

ज्या लोकांच्या जन्मकुंडलीत शनि किंवा राहू-केतू उच्च स्थानी आहे ते लाजवर्त धारण करु शकतात. ज्यांची लग्न राशी कुंभ आणि मकर आहे ते सुद्धा लाजवर्त धारण करु शकतात कारण यांच्यावर शनिदेवाच्या अधिपत्याखाली असतात.

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.