Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
लेखी परीक्षेकरीता एकूण पुरूष ३५७२ आणि एकूण महिला उमेदवार ११७५ असे एकूण ४७४७ असे उमेदवार उपस्थित होते सदर लेखी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देत असताना त्याना तपासले असता रामदास जनार्दन ढवले, (वय २३, रा. नाळवंडी ता. बीड जि. बीड), दत्ता सुभाश ढेंबरे (वय २२, रा. मौजवाडी ता. बीड जि. बीड) ईश्वर रतन जाधव (वय २१, रा. चांभारवाडी जि. जालना) गोरख गंगाधर गडदे (वय २४, रा. राक्षसवाडी जि बीड), सागर धरमसिंग जोनवाल (वय २०, रा. वडझडी जि. औरंगाबाद), शुभम बाबासाहेब कोरडे (वय २७, रा. नालनवाडी जि बीड) या सहा विदयार्थांच्या कानामध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस मिळून आले. त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यातील पाच विद्यार्थी अलिबाग येथील परीक्षा केंद्रावरून तर एकास पेण येथील परीक्षा केंद्रावरून ताब्यात घेण्यात आलं आहे.
आलिबाग येथील कन्या शाळा, अलिबाग रेवदंडा बाह्यवळण येथील डी.के.टी शाळा, वेश्वी येथील पी.एन.पी महाविद्यालय येथे रायगड जिल्हा पोलीस भरती सन २०२२-२०२३ च्या लेखी सुरू असताना सदर परिक्षेत कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रीक उपकरण वापरण्यास बंदी असताना देखील रामदास ढवले, दत्ता ढेंबरे, ईश्वर जाधव, गोरख गडदे, सागर जोनवाल या पाच आरोपीनी लेखी परीक्षेचे पेपर लिहीत असताना इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसमध्ये सिमकार्ड टाकून त्याच्या साह्याने कॉपी करुन शासनाची फसवणूक करत असताना मिळून आले.
याबाबत अलिबाग पोलिस ठाण्यात सी.आर.नं. १६९/२०२४ भारतीय न्यायसंहिता कलम १८ (२), १८(२), २२३, सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (ड) आणि महाराष्ट्र विदयापीठ बोर्ड आणि इतर परीक्षामध्ये होणाऱ्या गैरव्यवहारांना प्रतिबंध अधिनियम १९८२चे कलम ७, ८नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे हे करीत आहेत.
सदर विदयार्थी लेखी परीक्षेमध्ये कानात इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस टाकून परीक्षेत गैरप्रकार करण्याच्या उददेशाने मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडे अधिक चौकशी करुन त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता आणि इतर कायद्यान्वये अलिबाग पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना परीक्षेमध्ये गैरप्रकार करण्यासाठी ज्यांनी मदत करण्याचा प्रयत्न केला, अशांचा सुध्दा शोध सुरु आहे, असं पोलीस अधिक्षक यांनी सांगितलं आहे.