Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Ajit Pawar : ‘गुलाबी साडी’नंतर अजितदादांचे ‘गुलाबी जॅकेट’ चर्चेत! शरद पवार आणि ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
पण गुलाबी जॅकेटची चर्चा का?
लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यातून सावरण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांनी सुरू केलेल्या ‘जनसन्मान यात्रे’त त्यांच्या विशेष पेहरावाची चर्चा होत आहे. एरवी पांढऱ्या शुभ्र झब्बा पायजम्यात दिसणाऱ्या अजित पवार यांनी सदऱ्यावर अचानक गुलाबी जॅकेट चढवले आहे. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर असल्याने राजकीय रणनीतीकाराच्या सल्ल्यानंतर अजित पवार यांच्या पक्षाची ओळख गुलाबी रंग ठसविण्याचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. महिलांचा आवडता गुलाबी रंग पक्षाला लाभदायक राहील, असे त्यांना सांगितल्याने अजितदादांनीही जवळपास डझनभर गुलाबी रंगाची जॅकेट्स शिवून घेतले आहेत अशी माहिती मिळत आहे. अजितदादांच्या जनसन्मान यात्रेत गुलाबी गाडी आणि बस सुद्धा पाहायला मिळत आहे.
उद्धव ठाकरे यांनी सुद्धा ठाण्याच्या सेना मेळाव्यातून अजित पवारांच्या गुलाबी जॅकेटवर भाष्य केले. उद्धव ठाकरे म्हणाले, सगळ्या पक्षांनी यात्रा सुरु केले आहे. जा बाबा जा तीर्थयात्रेला जा!कोणी गुलाबी जॅकेट घालते कोणी केशरी जॅकेट घालते जा रंगपंचमी खेळा अशा शब्दात अजित पवारांच्या जॅकेटवर उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला.
अजित पवार यांच्या बदल्या रंगावरून त्यांचे काका, देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शरद पवार म्हणाले, शरद पवार यांना प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराने निळ्या रंगाचा शर्ट घातला होता. त्यावरून पवार म्हणाले, तुम्ही निळ्या कलरचे शर्ट परिधान केले आहे. तुमच्याकडे महिला आकर्षित होतील का…? पवारांच्या या उत्तराने पत्रकारांमध्ये हास्यकल्लोळ झाला.
गुलाबी पाण्याने धुतले रस्ते
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसने दिंडोरीतून खास गुलाबी रंगात जनसन्मान यात्रा सुरू करीत ‘लाडकी बहीण योजनेसह सरकारच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहचवू, हा अजित दादाचा वादा आहे, असे सांगितले. मात्र, सदर योजना निवडणूक जिंकण्याचा जुमला असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाने) युवक काँग्रेसने दिंडोरीत जनसन्मान यात्रा गेलेला रस्ता गुलाबी पाण्याने धुवत अनोखे निषेध आंदोलन केले.