Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

भीषण वास्तव! मराठवाड्यात ७ महिन्यांत ५११ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी, कोणत्या भागात सर्वाधिक घटना?

7

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी शासनस्तरावर विविध प्रयत्न सुरू आहेत. मात्र, असे असतानाही शेतकरी आत्महत्या सत्र कायम असल्याचे विदारक चित्र आहे. गेल्या सात महिन्यांत मराठवाड्यातील ५११ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. तर गेल्या दोन वर्षांत विभागात दोन हजार ११० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

बिघडलेले आर्थिक गणिते, कर्जाचा वाढता डोंगर

मराठवाडा म्हटले की, दुष्काळ, पाणी टंचाईचे संकट असे चित्र डोळ्यासमोर येते. येथील सुमारे ८० टक्यांपेक्षा अधिक क्षेत्र कोरडवाहू आहे. सर्वदूर सिंचनाची सोय नाही. विभागातील शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षात निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागत आहे.

कधी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान तर कधी मालाला भाव नाही , अशा परिस्थितीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. त्यामुळे बिघडलेले आर्थिक गणिते, कर्जाचा वाढता डोंगर अशा या चक्रात शेतकरी सापडतो . या व इतर कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर येत आहे . त्यात जानेवारी ते जुलै २०१४ या सात महिन्यांतच मराठवाड्यातील ५११ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. यात बीड जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येच्या सर्वाधिक म्हणजे ११५ घटना घडल्या. तर जानेवारी महिन्यात ८४ , फेब्रुवारीत ६२ , मार्चमध्ये ६७ , एप्रिल महिन्यात ५२ , मे मध्ये ८१ , जूनमध्ये ८६ तर जुलै महिन्यात विभागातील ७९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

शेतकरी आत्महत्या ( १ जानेवारी ते जुलै २०२४ अखेर)
जिल्हानिहाय आत्महत्येच्या घटना :-

छत्रपती संभाजीनगर —– ८०
जालना —– ४२
परभणी —– ३९
हिंगोली —– १८
नांदेड —– ८४
बीड —– ११५
लातूर —– ४५
धाराशीव —– ८८
एकूण —– ५११

गेल्या पाच वर्षातील शेतकरी आत्महत्या : –
वर्ष आत्महत्येच्या घटना ( संख्या )

२०१९ —–९३७
२०२० —– ७७३
२०२१ —– ८८७
२०२२ —– १,०२२
२०२३ —– १,०८८
एकूण —– ११,५१८

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.