Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Nashik News: निर्यातबंदी, युद्धांमुळे जिल्ह्याची होरपळ; निर्यातीत ६०० कोटींनी घट, कृषी क्षेत्राला सर्वाधिक फटका

6

सुदीप गुजराथी, नाशिक : जिल्ह्यातून होणाऱ्या निर्यातीत यंदा तब्बल सहाशे कोटींनी घट झाल्याची बाब समोर आली आहे. युक्रेन-रशिया युद्ध, इस्रायलचे गाझा पट्टीत हल्ल्यांसह आंतरराष्ट्रीय स्तरावरील अस्वस्थता, केंद्र सरकारने लादलेली कांदा निर्यातबंदी यामुळे २०२३-२४ मध्ये जिल्ह्यातून २३ हजार २२३ कोटींचीच निर्यात होऊ शकली. त्यापैकी जिल्ह्यातून नेदरलँडमध्ये सर्वाधिक ४४८ कोटींची निर्यात झाली आहे.

केंद्रीय उद्योग मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या वाणिज्य शोध व सांख्यिकी महासंचालनालयाच्या आकडेवारीतून जिल्ह्याच्या निर्यातीची सद्य:स्थिती समोर आली आहे. त्यानुसार २०२३-२४ मध्ये महाराष्ट्रातून एकूण पाच लाख ५६ हजार ४०० कोटींची निर्यात झाली. त्यात नाशिक विभागाचा वाटा ३० हजार कोटींचा, तर जिल्ह्याचा वाटा २३ हजार २२३ कोटींचा (राज्याच्या ४.८८ टक्के) होता. २०२२-२३ मध्ये नाशिक जिल्ह्यातून २३ हजार ८४३ कोटींची निर्यात झाली होती. मध्य-पूर्व आशियात सुरू असलेल्या युद्धांमुळे निर्यातीत घट झाली आहे. यापूर्वी लाल समुद्रामार्गे होणारी निर्यात आता दक्षिण आफ्रिकेमार्गे करावी लागत आहे. त्यामुळे उत्पादनाचा प्रवास कालावधी व खर्च वाढला आहे. याशिवाय गेल्या वर्षी केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लादल्याने एरवी प्रथम क्रमांकावर असणारा कांदा जिल्ह्याच्या निर्यातीत दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. पहिला क्रमांक द्राक्षांनी पटकावला आहे. त्या खालोखाल औषधे, वाहने, वाहनांचे सुटे भाग, औद्योगिक बोर्ड, पॅनल, इलेक्ट्रिकल कॅपॅसिटर, प्रेशर व्हॉल्व्ह, लोखंडी पाइप यांचा सर्वाधिक निर्यात झालेल्या पहिल्या दहा उत्पादनांत समावेश आहे. गेल्या वर्षी दहाव्या क्रमांकावर असलेला मका मात्र यंदा खाली सरकला आहे.

जिल्ह्यातून सर्वाधिक निर्यात झालेली दहा उत्पादने

द्राक्ष : २,५९२ कोटी, कांदा : २,३९४ कोटी, औषधे : १,४७६ कोटी, वाहनांचे सुटे भाग : ७५३ कोटी, वाहने : ६९९ कोटी, बोर्ड व पॅनल्स : ५४२ कोटी, कॅपॅसिटर : ४९३ कोटी, प्रेशर व्हॉल्व्ह : ४१२ कोटी, लोखंडी पाइप : २९३ कोटी

या देशांत सर्वाधिक निर्यात

नेदरलँड : ४४८ कोटी, अमेरिका : २५१ कोटी, संयुक्त अरब अमिरात : १९५ कोटी, जर्मनी : १८३ कोटी, इंग्लंड : १३६ कोटी, रशिया : १०१ कोटी, बांगलादेश : ७३ कोटी, दक्षिण आफ्रिका : ७० कोटी, सौदी अरेबिया : ५२ कोटी, कॅनडा : ५० कोटी

२३,२२३ कोटी
२०२३-२४ मधील जिल्ह्याची एकूण निर्यात

४.८८ टक्के
राज्याच्या निर्यातीतील जिल्ह्याचा वाटा

५,५६,४०० कोटी
२०२३-२४ मधील राज्याची एकूण निर्यात

१५.३७ टक्के
देशाच्या निर्यातीत राज्याचा वाटा

Ladki Bahin Yojana: ‘लाडक्या बहिणीं’च्या खात्यांमध्ये त्रुटी; १५ लाख लाभार्थ्यांची बॅंक खाती चुकीची किंवा बंद
सर्वाधिक निर्यात द्राक्ष, कांद्याची
द्राक्ष २,५९२ कोटी
कांदा २,३९४ कोटी
औषधे १,४७६ कोटी

नेदरलँड, अमेरिकेत सर्वाधिक निर्यात

नेदरलँड ४४८ कोटी
अमेरिका २५१ कोटी
संयुक्त अरब अमिरात १९५ कोटी

कृषी उत्पादनांमुळे निर्यातीत काहीशी घट झाली असली, तरी अन्य उत्पादनांच्या निर्यातीत वाढ होत आहे. जिल्ह्यातून निर्यातीला चांगले भवितव्य आहे.– ललित बूब, अध्यक्ष, आयमा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.