Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

वर्गणी काढली, खडी-माती आणली; महाड एसटी आगारातील कर्मचाऱ्यांनीच पैसे काढून खड्डे भरले

8

रायगड : कोकणातील मध्यवर्ती एसटी आगार म्हणून ओळखले जाणारे महाड एसटी बस स्थानक मागील दोन वर्षापासून खड्ड्यात गेले आहे. खड्डे भरण्यासाठी एसटी महामंडळाकडे पैसे नसल्याने अखेर आगारातील कर्मचाऱ्यांनी वर्गणी काढून खड्डे भरण्याची मोहीम चालू केल्याने एसटी महामंडळ कंगाल झाल्याची प्रतिक्रिया आगारातील प्रवाशांनी व्यक्त केली

एसटी आगारात खड्ड्याचं साम्राज्य

महाड एसटी आगारात मोठ्या प्रमाणावर खड्ड्याचं साम्राज्य पसरलं होतं. या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठल्याने प्रवाशांना खड्ड्यातूनच एसटी बसमध्ये प्रवेश करावा लागत होता. त्यामुळे अनेक प्रवाशांनी आगार व्यवस्थापकांकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या, मात्र त्याबाबत पेण विभागीय कार्यालयाकडून देखील कोणतीच कार्यवाही केली जात नसल्याने प्रवासी दररोज एसटी वाहक आणि चालकांबरोबर दररोज वाद-विवादाचे प्रसंग होत आणि अनेक प्रवाशांच्या अंगावर चिखलाचं पाणी गेल्याने अनेक प्रवासी एसटी चालक आणि वाहक यांच्याबरोबर वादविवाद करत होते.
Shakuntala Railway Track : स्वातंत्र मिळून ७५ वर्ष पूर्ण, पण आजही राज्यातील एक रेल्वे ट्रॅक ब्रिटिशांच्या ताब्यात, कारण काय?

कर्मचाऱ्यांनीच पैसे काढून खड्डे भरले

महाड एसटी आगारातील कर्मचाऱ्यांनी स्वखर्चाने पैसे काढून खड्डे भरण्यासाठी आवश्यक असणारे खडी, माती आणली. यामध्ये एसटी कर्मचारी सेनेचे सचिव रुचित चिनके, अध्यक्ष बाबासाहेब राजे महाडिक, अमर कल्याणकर यांनी खड्डे भरण्यासाठी जातीने लक्ष देण्याचं काम केलं. विभाग नियंत्रक दीपक घोडे आणि आगार स्थानक प्रमुख शिवाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महाड एसटी आगारात मंगळवारी खड्डे भरण्याची मोहीम राबवण्यात येत होती. खड्डे भरण्याचं काम चालू असल्याने काही प्रमाणात प्रवाशांनी याबाबत समाधान व्यक्त केलं.

मात्र ज्या प्रवाशांच्या जीवावर एसटी महामंडळ दररोज लाखो रुपये जमा करते, त्या प्रवाशांना खड्ड्यातूनच आणि खड्ड्यातील पाण्यातून प्रवास करण्याचं पाप मात्र एसटी महामंडळ का करते? असा सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे. महाड एसटी आगारातील पडलेले खड्डे भरण्याचे सौजन्य एसटी महामंडळाने दाखवले नाही. शौचालयाच्या पाण्यातील दुर्गंधीमुळे प्रवाशांना व शालेय विद्यार्थ्यांना तसंच महिला वर्गाला जो नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्याबाबत एसटी महामंडळ कधी जागे होणार असा सवाल या निमित्ताने प्रवासी विचारत आहेत

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.