Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

रामराजे निंबाळकरांना मोठा धक्का, कट्टर समर्थकाचा भाजप प्रवेश, रणजितसिंहांनी डाव साधला

7

सातारा : विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे विश्वासू माणिकराव सोनवलकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. सोनवलकर यांचा हा पक्ष प्रवेश रामराजे गटाला आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठा धक्का मानला जात आहे.

सोनवलकर हे २०१२ मध्ये कोळकी जिल्हा परिषद गटातून निवडून आले होते. त्यांनी सुमारे दीड वर्ष सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपद भूषवले आहे. फलटण तालुक्यातील धनगर समाज संघटना आणि त्या माध्यमातून उत्तम काम करणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या पत्नी सौ. भावनाताई सोनवलकर याही २०१७ साली जिल्हा परिषदेवर निवडून गेल्या होत्या. त्यांच्या भावजयही दहा वर्षे पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून गेल्या होत्या.

रामराजे नाईक निंबाळकर, संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांच्याकडे पहिले जात होते. त्यांचा भाजप प्रवेश हा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांना मोठा धक्का दिल्याचे मानले जात आहे. सोनवलकर यांनी राजे गटाला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केला.
Jintur Vidhan Sabha : शरद पवारांच्या शिलेदाराची फुल्ल तयारी, तरी राष्ट्रवादीच्या मतदारसंघात काँग्रेसचा दावा, मविआत रस्सीखेच
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शिवरुपराजे खर्डेकर यांची उपस्थिती असल्याने फलटण तालुक्यातील अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आता फलटण तालुका हा भाजप सोबत खंबीरपणे उभा राहणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. फलटण शहरासह तालुक्याचा गेल्या ३० वर्षांपासून विकास रखडला होता. तो मार्गी लावण्यासाठी भाजपच्या माध्यमातून आम्ही सर्वजण कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं.

विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी राजकारणात प्रवेश केल्यापासून माणिकराव सोनवलकर हे राजे गटासोबत राहिले होते. त्यांनी दुधेबावी ग्रामपंचायतीपासून अगदी सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदापर्यंत मजल मारली होती. त्यानंतर सोनवलकर व त्यांची पत्नीसुद्धा रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या फलटण एज्युकेशन सोसायटीमध्ये सेवेमध्ये आहेत.
Ajit Pawar Confession : सुप्रियांविरुद्ध सुनेत्रांना उभं करायला नको होतं, अजित दादांची खंत, माझं मन मला सांगतंय…

सोनवलकर यांच्या प्रवेशाने राजे गटात खिंडार पडले असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. आ. रामराजे नाईक- निंबाळकर यांच्या राजे गटामधून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वामध्ये कार्यरत असणाऱ्या खासदार गटामध्ये येणाऱ्या कार्यकर्त्यांचा ओघ लोकसभा निवडणुकीनंतर सुद्धा कायम राहिला आहे. माजी उपसभापती संजय सोडमिसे, संजय कापसे, संतकृपा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा विलासराव नलवडे, माजी नगरसेवक अजय माळवे, युवा नेते सुधीर अहिवळे यांच्यासह फलटण तालुक्यातील विविध गावच्या सरपंचांनी राजे गटाला राम राम ठोकत खासदार गटांमध्ये प्रवेश केला आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.