Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Vidhan Sabha : युतीच्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला! ठाकरेंच्या शिलेदाराविरोधात गुहागरमध्ये माजी आमदार रिंगणात

9

रत्नागिरी,प्रसाद रानडे : कोकणात लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने तयारी सुरू केली आहे. राजापूर मध्ये रवींद्र नागरेकर तर गुहागर मधून भाजपाचे माजी आमदार डॉ.विनय नातू यांनी तयारी सुरू केली आहे. गुहागरचे माजी आमदार विनय नातू यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी गावभेट दौराही सुरू केला आहे त्यामुळे ठाकरे गटाचे गुहागरचे विद्यमान आमदार भास्कर जाधव यांच्यासमोर महायुतीकडून भाजपाकडून डॉ. विनय नातू यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे. भाजपाचे युवा नेते रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार निलेश राणे यांनी डॉ.विनय नातू यांना लागेल ती मदत करण्याचे जाहीर आश्वासन भास्कर जाधव यांना दिलेल्या उत्तर सभेत दिले होते. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील पारंपरिक असलेल्या भाजपाचा गुहागर विधानसभा मतदारसंघ पुन्हा एकदा ताब्यात घेण्यासाठी महायुतीकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत.

गुहागरचा राजकीय इतिहास काय?

गुहागर विधानसभा मतदारसंघात माजी आमदार डॉ. तात्यासाहेब नातू यांचं वर्चस्व होत. त्यांनी या मतदारसंघाचा चार टर्म नेतृत्व केलं होतं, त्यानंतर त्यांचे सुपुत्र डॉ. विनय नातू यांनीही या मतदारसंघाचे दोन वेळा नेतृत्व केल. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील बदललेल्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेत खेड विधानसभा मतदारसंघ रद्द झाल्यानंतर गुहागर मधून शिवसेनेचे नेते रामदास भाई कदम यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, त्यांचा पराभव झाला. तेव्हापासून हा मतदारसंघ युतीचे ताब्यातून गेला होता. मात्र, भास्कर जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर हा मतदारसंघ शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे आहे.
Ratnagiri Vidhan Sabha: लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभेसाठीही कोकणात शीतयुद्ध रंगणार? रत्नागिरीच्या जागांवर दावे-प्रतिदावे

विनय नातू महाविकास आघाडी विरोधात रिंगणात

गुहागर मतदार संघाचा काही भाग खेड तालुक्यात येतो. खेड तालुक्यातील साडेतीन जिल्हा परिषद गट हे गुहागर तालुक्यात येतात. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा गावभेट दौरा सुरू करण्यात आला आहे. त्या निमित्ताने सोमवारी माजी आमदार विनय नातू यांनी मोरवंडे गावातील ग्रामस्थांना भेट दिली. यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी माजी आ.नातू यांनी लोकसभेला मोदींजींना आपण पंतप्रधानपदी विराजमान केलंत त्या बद्दल बैठकीच्या सुरुवातीलाच आभार मानले. भारतीय जनता पक्षाची विचारधारा आणि मोदींजींची देशा बद्दल ची संकल्पना ग्रामस्थांना पटवून दिली. महाविकास आघाडीचे नेते आणि पदाधिकारी स्थानिक ग्रामस्थांना कशा पद्धतीने महायुतीच्या विरोधात भडकवत आहेत याबाबतही नातू यांनी विवेचन केले. हा विरोधाभास निर्माण करताना मतदारांची कशी फसवणूक करीत आहेत. विकासाच्या दृष्टीने महायुतीचे जे काम सुरू आहे. त्या संदर्भात अधिक माहिती दिली.
उदय सामंतांसमोर तगडा उमेदवार शोधा, ठाकरेंकडून विश्वासू शिलेदारावर जबाबदारी, नार्वेकर कोकणात

भाजपच्या विविध योजना आणि त्याची अंमलबजावणी करताना महायुती कश्या पद्धतीने कामकाज करीत आहे. या संदर्भात माजी आमदार नातू यांनी माहिती दिली. यापूढे गुहागर मतदार संघात भाजपच्या माध्यमातून तळागाळातील उपेक्षित जनसमुदायाला विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता अग्रभागी असेल असे श्री .नातू यांनी सांगितले. यावेळी जिल्हा सरचिटणीस विनोद चाळके, जगदीश आंब्रे, तालुकाध्यक्ष किशोर आंब, संजय आंब्रे, विजय तांबे, सुरेश खोचरे, मनोहर शिगवण, विजय शिगवण, महेश कदम यांच्या सह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

याच सगळ्या पार्श्वभूमीवरती ठाकरे गटाचे नेते गुहागर विधानसभेचे विद्यमान आमदार भास्कर जाधव यांना महायुती टक्कर देण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाल आहे. त्यामुळे गुहागर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा एकदा लक्षवेधी ठरणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भास्कर जाधव आणि महायुतीचे विनय नातू यांच्यात संघर्ष पाहायला मिळू शकतो. माजी आमदार विनय नातू यांच्या विजयाची जबाबदारी ही पालकमंत्री उदय सामंत, भाजपाचे ज्येष्ठ नेते विद्यमान खासदार नारायण राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. त्यामुळे गुहागर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही लक्षवेधी ठरणार आहे हे जवळपास निश्चित आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.