Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Vidhan Sabha Seat Sharing; महाविकास आघाडीत बिघाडी, महायुतीत कुरघोडी, मनसेचा ‘एकला चलो’ ची घोषणा कोणाचा होणार फायदा?

9

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी शांत होत नाही तो महाराष्ट्रातील पक्षांना विधानसभेचे वेध लागल्याचे दिसत आहे. लोकसभेला ४८ जागांचं वाटप करताना महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांच्या नाकीनऊ आले होते आता तर विधानसभेला २८८ जागांचा विषय आहे. विधानसभेच्या जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी बरीच रस्सीखेच होताना दिसत आहे. यातच कमी की काही म्हणून काही प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. चला तर मग जाणून घेऊ कोणत्या पक्षाने आपले उमेदवार जाहीर करून विधानसभा मतदारसंघावर दावा जाहीर केला आहे.

कर्जत जामखेड विधानसभा – अहमदनगर लोकसभा दक्षिण मतदारसंघातील प्रचार सभेच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी कर्जत जामखेड मतदार संघामधून राम शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली होती. सध्या या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार हे आमदार आहेत. राष्ट्रवादीतील फुटीनंतर रोहित पवार हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आहेत. या मतदार संघावर अजित पवार यांची राष्ट्रवादी ही दावा करू शकते.

Nitesh Rane warns Police : पोलिसांनो, मस्ती कराल तर अशा जिल्ह्यात पोस्टिंग करुन, बायकोला फोनही लागणार नाही, नितेश राणेंचा दम
आष्टी विधानसभा – लोकसभा प्रचारावेळी राम शिंदे यांच्या उमेदवारी सोबतच देवेंद्र फडणवीस यांनी आष्टी मतदारसंघातून सुरेश धस यांचीही उमेदवारी जाहीर केली होती. या मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब आजबे हे आमदार आहेत सध्या ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत आहे.

कागल मतदारसंघ – अजित पवार यांनी कागल विधानसभा मतदार संघातून हसन मुश्रीफ यांची उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदार संघात भाजपचे उमेदवार समरजितसिंह घाडगे यांनी दावा सांगितलं होता.

दिंडोरी मतदारसंघ – दिंडोरी मतदारसंघातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने नरहरी झिरवळ यांची उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र नरहरी झिरवळ यांच्या उमेदवारीला शिंदे यांच्या शिवसेनेमधून आव्हान देण्यात येत आहे. यामुळे महायुतीत तणावाचे चित्र दिसत आहे. नरहरी झिरवळ यांचे चिरंजीव गोकुळ झिरवळ हेही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी मधून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे.

पाथरी विधानसभा – पाथरी मतदारसंघातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विद्यमान आमदार सुरेश वरपूडकर यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे . या मतदारसंघात मधून राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाकडून बाबाजानी दुर्रानी इच्छुक आहेत.

Ladki Bahin Yojana: …अन्यथा लाडकी बहीण योजना बंद करु, सर्वोच्च न्यायालयाची राज्य सरकारला तंबी
तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा – तासगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे रोहित पाटील हेच आमचे उमेदवार असतील अशी घोषणा शरद पवार यांनी केली होती. या मतदार संघावर भाजपही दावा करू शकतो.

करमाळा विधानसभा – करमाळा मतदारसंघात पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जयंत पाटील यांनी माजी आमदार नारायण पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. या मतदारसंघामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे संजय शिंदे हे आमदार आहे. या मतदार संघावर भाजपही दावा करू शकतो.

अकोला विधानसभा – अकोला मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमित भांगरे यांच्या उमेदवारीची अप्रत्यक्षरित्या घोषणा केली. या मतदार संघामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे किरण लहामटे हे आमदार आहेत. या मतदार संघावर भाजपही दावा करू शकतो.

चिपळूण विधानसभा – चिपळूण मतदारसंघावर शिवसेना उपनेते माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी दावा जाहीर केला आहे. या मतदारसंघामधून राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाचे शेखर निकम हे आमदार आहेत.

शिवडी विधानसभा – मनसेने दक्षिण मुंबई मधील शिवडी विधानसभेसाठी बाळा नांदगावकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. सध्या शिवडी विधानसभेत शिवसेना ठाकरे गटाचे अजय चौधरी हे आमदार आहेत.

पंढरपूर विधानसभा – पंढरपूर मतदारसंघातून मनसेने दिलीप धोत्रे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघात भाजपचे समाधान अवताडे विद्यमान आमदार आहेत.

लातूर ग्रामीण विधानसभा – लातूर मतदारसंघातून मनसेने संतोष नागरगोजे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे धीरज देशमुख विद्यमान आमदार आहेत.या मतदार संघात भाजपनेही तयारी सुरू केली असून येथे तिरंगी लढत होऊ शकते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.