Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

काँग्रेसला धक्का, आमदार खोसकर-अंतापूरकर ‘वर्षा’वर, शिवसेनेत प्रवेशाच्या चर्चांना उधाण

8

मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महाविकास आघाडीला जबर धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसचे दोन आमदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेस आमदार हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर यांनी एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ बंगल्यावर मंगळवारी रात्री हजेरी लावली. त्यामुळे दोघेही येत्या काही दिवसात काँग्रेसचा ‘हात’ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्या प्रकरणी कारवाई होण्याआधीच दोघंही आमदार पक्षाला रामराम ठोकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीने यासंदर्भात बातमी दिली आहे. परंतु आमदार जितेश अंतापूरकर यांनी प्रतिक्रिया देताना ई-पीक पाहणी संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचा दावा केला. तसंच यावेळी कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं अंतापूरकरांनी सांगितलं आहे. तर मी आहे तिथेच राहणार असून मला उमेदवारीही मिळणार आहे. निधीसंदर्भात बोलण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं खोसकर म्हणाले.
Parth Pawar : श्रीरंग बारणेंना लोकसभेला कोणी मदत केली, त्यांच्या मुलाला विचारा, पार्थ पवारांचं सूचक भाष्य
दरम्यान, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनीही हे वृत्त नाकारताना काही कामासाठी भेट झाली असण्याची शक्यता आधीच व्यक्त केली होती. मुख्यमंत्र्यांकडे आमदारांची कामं असतात, त्यांची अशी अडवणूक करता येत नाही, असं लोंढे म्हणाले होते.

काय आहे पार्श्वभूमी?

नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या पाच आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचं समोर आलं होतं. मात्र गुप्त मतदान असल्यामुळे पक्षाला थेट कोणाकडे बोट दाखवता येत नव्हतं. परंतु सांकेतिक खुणांच्या माध्यमातून आपण आमदारांची ओळख पटवल्याचं सांगत पक्षश्रेष्ठींनी संबंधित आमदारांवर कारवाईचे संकेत दिले होते. काँग्रेसमधून हकालपट्टी अथवा निलंबनाची कारवाई झाली असती, तर गोपनीय मतदानाच्या कारणामुळे ही बाब कोर्टात टिकणं अवघड झालं असतं. संशयाच्या आधारे निलंबनाची कारवाई शक्य नव्हती. त्यामुळे तूर्तास आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना तिकीट नाकारण्याचा पर्याय पक्षासमोर होता. ज्या पाच आमदारांची नावं चर्चेत होती, त्यात खोसकर आणि अंतापूरकर या दोघांचंही नाव होतं. त्यामुळे कारवाई आधीच दोघांनीही पक्षांतराचा पर्याय निवडल्याची चर्चा आहे.
Babajani Durrani : राष्ट्रवादीच्या मतांवर काँग्रेस विजयी, माझ्यासारखा सक्षम मुस्लीम उमेदवार हवा, दुर्रानींची मागणी
यापैकी जितेश अंतापूरकर हे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे चव्हाणांमागून तेही भाजप प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची वाट त्यांनी धरली आहे का, अशी चर्चा सुरु आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.