Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

३ बांगलादेशी दवाखान्यात, त्यांच्याकडे खोटी कागदपत्रे, पुण्यात वाऱ्यासारखी बातमी पसरली, काय घडलं?

9

पुणे : बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या अराजकताची झळ ही भारताला सोसावी लागतच आहे. पण आता इतर राज्यातून येणाऱ्या लोकांवरचा संशय बळावू लागला आहे. पुणे आज एका घटनेमुळे प्रचंड हादरलं आहे. पुण्यातल्या कमला नेहरू रुग्णालयात संशयित अतिरेकी घुसल्याचा माहिती पुणे पोलिसांना मिळाली आणि एकच गोंधळ उडाला. सुरक्षच्या कारणास्तव पोलिसांनी खबरदारी म्हणून कलमा नेहरू रुग्णालय मोकळं केलं. तसंच संशयास्पद आरोपींना ताब्यात घेतलं. आता संशयितांपैकी बांगलादेशी कोण आहेत? याचा तपास पोलीस घेत आहेत.
Pune News : ऑलम्पिकमध्ये मेडल जिंकण्याचं स्वप्न, पण पुण्यात खड्ड्यामुळे अपघात, महाराष्ट्र केसरी सुवर्णपदक विजेता अंथरुणाला खिळून

संशयित बांगलादेशींचं लोहियानगरात वास्तव्य

दोन दिवसांपूर्वी काही संशयित बांगलादेशी हे पुण्यातल्या लोहियानागर हा भागात वास्तव्यात होते. तिथल्या काही नागरिकांना ते तीन बांगलादेशी संशयित अतिरेकी असल्याचा संशय आला होता. नागरिकांनी त्यांच्या फोटो सोशियल मीडियावर व्हयरल केला होता. दरम्यान उपचारासाठी तिघांमधला एक जण कमला नेहरू रुग्णालयात गेला होता. व्हायरल झालेला फोटो कमला नेहरूमधल्या एका कर्मचाऱ्याने पहिला आणि पडताळणी केली. दुसऱ्या दिवशी म्हणजे आज बुधवारी त्या संशयित व्यक्तीला रिपोर्ट घेण्यासाठी बोलवलं सापळा रचण्यात आला. त्यानंतर तिघांना एका खोली डांबून ठेवलं. रुग्णालयात तात्काळ पोलिसांना बोलवत आरोपीनां ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू आहे.
Dombivali News : पार्सलमध्ये संदिग्ध वस्तू आढळल्याचा डॉक्टरला कॉल, पुढे असं काही घडलं की…डोंबिवलीत महिलेला ३० लाखांचा गंडा
पुण्यात मंगळवारी ११.३० वाजता तीन संशयितांना बांगला भाषेत बोलताना पाहण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांच्या हालचाली संशयित वाटल्याने त्यांचा व्हिडिओ काढण्यात आला आणि तो व्हायरल झाला. हे तिघं लोहियानगर येथील सोनवणे रुग्णालयाच्या भागात हे तिघं फिरत होते. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली आणि सीसीटीव्हीच्या आधारे त्यांचा शोध घेण्याचं सांगण्यात आलं. तीन बांगलादेशींकडे बनावट कागदपत्र सापडल्याचीही माहिती आहे.
Kolkata Doctor Murder Case : मला फाशी द्या… डॉक्टर तरुणीच्या हत्येनंतर आरोपीची कबुली

पोलीस उपायुक्त झोन एकने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हे तीन व्यक्ती मूळचे बिहारचे रहिवासी आहेत, अशी माहिती मिळाली आहे. हे तिघे २७ जुलै रोजी पुण्यात आले होते. जवळपास महिनाभरासाठी ते पुण्यात आले होते. बिहारमधल्या मदरशामध्ये ते शिकवणीचे काम करतात. मात्र ते वर्गणी गोळा करण्यासाठी पुण्यात आले होते, अशी प्राथमिक माहिती आहे. पुण्यात वर्गणी गोळा करण्यासाठी त्यांना कोढंवा भागातील मुस्लिम धार्मिक उलेमांनी परवानगी दिली आहे. त्या तिघांकडेही परवानगीचं पत्र आहे, अशी माहिती संदीप गिल यांनी दिली आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.