Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
याबाबत घटनास्थळ व पोलिसांनी सांगितले की पुण्याहून पलूसकडे एसटी बस निघाली होती. एसटीमध्ये प्रवाशांची गर्दी होती. पुणे -बंगळुरू महामार्गावरील भुईंज येथील विरंगुळा हॉटेलजवळ असलेल्या पेट्रोल पंपाजवळ एसटी आल्यानंतर अचानक पुढील डाव्या बाजूच्या चाकाखाली दुचाकीस्वार अडकला. डांबरी रस्त्यावरून दुचाकी घासत गेल्याने स्पार्किंग झाले. त्यामुळे दुचाकीला आग लागली. एसटीच्या चाकाखाली दुचाकीस्वार अडकल्याने बाहेर निघता आले नाही.
या घटनेत एसटी बसला आग लागल्याचे समजताच चालक व वाहकाने प्रवाशांना तातडीने खाली उतरण्यास सांगितले. घाईगडबडीत प्रवाशांच्या बॅगा एसटीतच राहिल्या. प्रवाशांनी खिडकी, दरवाजा व संकटकालीन मार्गाने उड्या मारून आपला जीव वाचवला. सर्व प्रवासी व चालक, वाहकाने खाली उतरून अग्निशमन दलाला याची माहिती दिली. काही क्षणातच आगीने राैद्ररूप धारण करत संपूर्ण एसटी आगीच्या भक्षस्थानी पडली. वाई नगरपरिषद व भुईंज कारखाना येथून अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी आली. त्यांनी पाण्याचे फवारे मारून आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत एसटीसह दुचाकीस्वारही जळून खाक झाला. त्या मृत दुचाकीस्वाराची रात्री उशिरापर्यंत पोलिसांना ओळख पटली नव्हती. भुईंज पोलिस अपघाताचा तपास करीत आहेत.
पोलिस भरतीहून एक तरुणी पुण्याहून कऱ्हाडला निघाली होती. एसटीला आग लागल्यानंतर तिची बॅग एसटीमध्येच राहिली. त्या बॅगमध्ये मूळ शैक्षणिक कागदपत्रे होती. ही कागदपत्रे जळून खाक झाली. अग्नीशामक यंत्रणा लवकर आली असती तर माझी कागदपत्रे वाचली असती, अशी संतप्त भावना त्या तरुणीने व्यक्त केली.