Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मुंबईतील पत्राचाळ घोटाळाप्रकरणी संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती. राऊतांवर ईडीकडून कारवाई करण्यात आली.संजय राऊत जवळपास तीन महिने जेलच्या आतमध्ये होते. मुंबईतील ऑर्थर जेलमध्ये राऊत यांना ठेवण्यात आले होत. याच जेलमध्ये राऊतांसोबत राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सुद्धा वास्तव्याला होते. राऊतांनी माहिती दिली, की काही जणांना वाटत असेल की खासदार आमदार मंत्र्यांना जेलमध्ये चांगली ट्रिटमेंट मिळत असेल पण तसे काहीच नाही. राऊत म्हणाले आजूबाजूला अनोळखी लोक असतात.तुरुंगाच्या भिंती तुम्हाला खायला उठतात.विजेचे दिवे नेहमी चालू असतात.
पुढे राऊतांनी सागितले, माझ्या बाजूच्या खोलीत अनिल देशमुख राहत होते.तर समोर अजमल कसाबचा तुरुंग होता. कसाबचे साहित्य अजूनही तसेच त्या खोलीत ठेवण्यात आले आहे. तुरुंगात खासदार किंवा आमदार म्हणून वेगळा असे काही ऐशोआराम नसतो. प्रत्येक ठिकाणी चेकिंगला सुद्धा तुमचे पूर्ण कपडे उतरवून तुम्हाला कैद्यासारखे चेक केले जाते. सकाळी लवकर उठावे लागते, दुपारचे जेवण अकरा आणि रात्रीचे जेवण सातला मिळते.
पुढे राऊत यांनी देशमुख आणि त्यांच्या जेलमधील काही गमतीशीर आठवणी सांगितल्या राऊत म्हणाले, अनिल देशमुख आणि आम्ही छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधायचो. तुरुंगात आठवड्यातून एक दिवस मांसाहार दिला जातो. मी आणि देशमुख कुठून तरी मटणाची व्यवस्था करायचो. तुंरुगात काही ओळखीचे लोक असतील त्यांचा मदतीने खिमा पाव करुन खायचो असे विधान राऊत यांनी केले आहे