Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Central Railway : मध्य रेल्वेवर धावणार लोकलऐवजी बैलगाड्या? प्रवाशाच्या तक्रारीवर अधिकृत खात्याचा प्रतिसाद

7

मुंबई : मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाणारी ८.१३ची जलद बैलगाडी थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर येत आहे. किंवा, ९.२७ची दादरला जाणारी धीमी बैलगाडी थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर येत आहे. किंवा, दुपारी २.०३ची ठाण्याला जाणारी एसी बैलगाडी थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर येत आहे… अशा घोषणा येत्या काळात तुमच्या कानांवर पडल्या तर आश्चर्य वाटू देऊ नका. कारण, मध्य रेल्वेवर लोकल गाड्यांऐवजी बैलगाड्या चालवण्याचा विचार मध्य रेल्वेचे प्रशासन करीत आहे!

उपनगरी गाड्यांना होणाऱ्या रोजच्या विलंबामुळे मध्य रेल्वेचे लाखो प्रवासी रोज हैराण होत असतात. त्याबाबतच्या आपल्या तक्रारी ते सातत्याने ‘एक्स’ या समाजमाध्यमावर नोंदवून मध्य रेल्वेच्या अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना, खात्यांना त्यात टॅग करीत असतात. त्या तक्रारींना संबंधित अधिकारी प्रतिसादही देत असतात. मध्य रेल्वेच्या कारभारामुळे त्रस्त झालेल्या अशाच एका प्रवाशाने मध्य रेल्वेच्या कारभाराची तक्रार मंगळवारी ‘एक्स’वर नोंदवली…

इंग्रजी भाषेतून नोंदवलेल्या या तक्रारीचा सूर पुढीलप्रमाणे होता… ‘प्रिय मध्य रेल्वे, तुम्ही तुमचे वेळापत्रक मोडीत काढा. आणि एक गोष्ट करा, मुंबईत लोकलगाड्या चालवण्याऐवजी बैलगाड्यांची सेवा सुरू करा.’ या पोस्टला ‘रेल्वेसेवा’ या ‘एक्स’ खात्याच्या माध्यमातून प्रतिसाद देण्यात आला. रेल्वे प्रवाशांच्या मदतीसाठीचे अधिकृत खाते, असे या खात्याचे स्वरूप आहे. ‘आवश्यक कार्यवाहीसाठी हा मुद्दा संबंधित अधिकाऱ्यांकडे उपस्थित करण्यात आला आहे’, असे म्हणत, ‘रेल्वेसेवा’ या खात्याने संबंधित प्रवाशाच्या तक्रारीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे! त्यामुळे, आता लोकल गाड्यांऐवजी बैलगाड्या चालवण्याच्या विचारावर मध्य रेल्वे सकारात्मक आहे, असे दिसत आहे!!
पुणे रेल्वे विभागाची छप्परफाड़ कमाई; जुलैत कमावले करोडो रुपये, किती मिळाले उत्पन्न?
मध्य रेल्वेवर बैलगाड्या सुरू करायच्या झाल्या तर येत्या काळात त्यासाठी हजारो बैल आणि बैलगाड्या हाकण्यासाठी गाडीवान लागतील. बैलांना धावण्यासाठी रुळांऐवजी मातीचे वा डांबरी रस्तेपट्टे बांधावे लागतील. तसेच, गाड्यांना जुंपल्या जाणाऱ्या बैलांसाठी चाऱ्यापाण्याची सोय निरनिराळ्या स्थानकांत करावी लागेल. त्यांच्या विश्रांतीसाठी ठिकठिकाणी डेपो उभारावे लागतील… अशा अनेक मुद्द्यांकडे प्रवासी लक्ष वेधत आहेत.

एसी बैलगाडी…

लोकलची जागा बैलगाड्यांनी घेतल्यानंतर सध्याच्या एसी लोकलऐवजी एसी बैलगाड्या सुरू कराव्या लागतील. त्यासाठी गाडीवरील तट्ट्यात (गाडीवरील आच्छादन) काही बदल करावे लागतील, याकडे जाणकार लक्ष वेधत आहेत.

हे मुद्दे महत्त्वाचे…

– एका बैलगाडीत किती प्रवासी बसणार?
– बैलगाडीत किती प्रवासी उभे राहणार?
– या प्रवासाचा तिकीटदर कसा ठरवणार?
– या प्रवासाच्या पासचा दर कसा ठरवणार?
– किती वयापर्यंतचे बैल गाडीला जुंपणार?

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.