Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
नवाब मलिक यांची पोस्ट
‘आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा’ अशा आशयाची हिंदी आणि इंग्रजीतील पोस्ट नवाब मलिक यांनी शेअर केली आहे. सोबत जोडलेल्या फोटोत नवाब मलिक, आमदार अणूशक्ती नगर असा उल्लेख करताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत निवडणूक चिन्ह घड्याळ लावले आहे.
काल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करताना शेअर केलेल्या पोस्टमध्येही नवाब मलिक यांनी घड्याळ चिन्ह दर्शवले होते. मात्र त्याआधी कुठल्याही पोस्टमध्ये मलिक यांनी शरद पवारांसोबत की अजित पवारांसोबत हे स्पष्ट करणारी खूण वापरली नव्हती.
पाचवेळा आमदारकी
नवाब मलिक हे मुंबईतील अणूशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर आमदारपदी निवडून आले आहेत. मलिक हे पाचव्यांदा आमदार झाले आहेत. याआधी १९९६, १९९९ आणि २००४ अशा तीन वेळा ते नेहरुनगर मतदारसंघातून निवडून आले आहेत. तर २००९ मध्ये ते अणूशक्ती नगरचे आमदार झाले. आता २०१९ मध्ये पुन्हा त्यांनी याच मतदारसंघातून आमदारकी मिळवली. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे.
दाऊदशी संबंधांचे आरोप
नवाब मलिक यांना २३ फेब्रुवारी २०२२ रोजी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचाही त्यांच्यावर आरोप होता. मलिक यांनी दाऊद इब्राहिमच्या साथीदाराकडून प्रचलित बाजारभावापेक्षा कमी किमतीत मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर केला होता.
एक वर्ष पाच महिन्यांचा काळ तुरुंगात घालवल्यानंतर नवाब मलिक ऑगस्ट २०२३ मध्ये जामिनावर बाहेर आले. याच वेळी अजित पवार यांनी महायुती सरकारमध्ये सहभाग घेतला होता. तुरुंगात जाण्यापूर्वी महाविकास आघाडीत असलेल्या नवाब मलिक यांचा कल बाहेर आल्यानंतर अजित दादांकडे दिसला. त्यावेळी अजित दादांच्या राष्ट्रवादीच्या विधानसभेच्या कार्यालयातील मलिकांची उपस्थिती भुवया उंचावणारी होती. यावरुन फडणवीसांना प्रश्न विचारला असता त्यांनी मलिक यांचा महायुतीत सहभाग नसल्याचं सांगितलं होतं. तिथली उपस्थिती केवळ राष्ट्रवादीच्या जुन्या सहकाऱ्यांशी झालेली भेट होती, अशी सारवासारवही करण्याची वेळ दादा गटावर आली होती.