Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मुख्यमंत्री लेखी आश्वासन देत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार; मुंबई-गोवा महामार्गासाठी जन आक्रोश समिती आक्रमक

11

प्रसाद रानडे, रायगड – माणगाव : मुंबई-कोकण महामार्ग पूर्ण होत नाही तोपर्यंत अन्य कोणताही हायवे कोकणात बनवू नये अशी भूमिका घेत जन आक्रोश समिती आक्रमक झाली आहे. राष्टीय महामार्ग पूर्ण व्हावा यासाठी आमरण उपोषण सुरू केले असून जो पर्यंत ठोस उत्तरे मिळत नाही, मुख्यमंत्री लेखी उत्तरे देत नाहीत तो पर्यंत माघार नाही, असा निर्धार जन आक्रोश समितीच्यावतीने व्यक्त करण्यात आला आहे. या उपोषणाला समृद्ध कोकण संघटनेचे संजय यादवराव यांनीही पाठींबा दिला आहे. माणगाव येथे १५ ऑगस्ट रोजी सुरू केलेले हे आमरण उपोषण संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होते.

दरम्यान, गुरुवारी उपोषण स्थळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनी भेट दिली. या सगळ्यांनाही जन आक्रोश समितीच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले. मात्र आज दिवसभर सत्ताधारी पक्षातले आमदार खासदार मंत्री यातील एकाही मंत्र्याने उपोषण स्थळी भेट देण्याचा प्रयत्न केलेला नाही याबद्दलही आश्चर्य व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जोपर्यंत उपोषण स्थळी येत नाहीत, लेखी आश्वासन देत नाहीत तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, अशी आक्रमक भूमिका आता जन आक्रोश समिती आणि समृद्ध कोकण संघटनेने घेतली आहे.

पनवेल ते इंदापूर ७९ किलोमीटरचा हायवे बनवायला १७ वर्षे लागली, इंदापूरपासून ऊरलेला हायवे बनवायला १२ वर्षे लागली. अजून किती वर्ष लागतील कोणीही सांगू शकत नाही. कोकण महामार्गाने जगातले सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. या हायवे संदर्भातील कोकणवासियांची सहनशक्ती संपली आहे आणि म्हणूनच जन आक्रोश समितीने आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे.
Mumbai Goa Highway : १७ वर्षांपासून मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाचं काम रखडलं, रस्त्यावर खड्डेच-खड्डे, १५ ऑगस्टपासून आमरण उपोषण

अनेक चुका आणि धोकादायक ठरत असलेला समृद्धी हायवे पाच वर्षात पूर्ण

नव्याने जमीन विकत घेऊन पाचशे किलोमीटरचा समृद्धी हायवे पाच वर्षात बांधून पूर्ण झाला. याबरोबरच हा हायवे बांधताना अनेक चुका झाल्या आहेत. थोकादायक वळणे तशीच आहेत, सर्विस रोड नाही, मातीचे डोंगर फोडल्यामुळे परशुराम मंदिर आणि पेढे परशुराम सारखी गावे धोक्यात आली आहेत, भोस्ते घाटसारखी धोकादायक वळणे तशीच आहेत. शाळेतल्या विद्यार्थ्यांना, गावकऱ्यांना पलीकडे जाण्यासाठी अंडरपास आवश्यक आहेत, गावातील रस्ते थेट हायवेवर येतात यामुळे असंख्य निष्पाप जीवांना आजवर जीव गमवावा लागला आहे. या चुका तातडीने सुधारल्या पाहिजेत. हा हायवे पुढील वर्षभरात पूर्ण झाला होऊन सुरक्षित झाला पाहिजे, अशीही मागणी केली आहे.
Ganeshotsav 2024: गणेशोत्सवाआधी रस्ते चमकणार, मुख्यमंत्री शिंदेंकडून गणेशभक्तांना ‘टोल फ्री’ गिफ्ट

मुंबई-गोवा हायवेला स्वराज्यभूमी कोकण महामार्ग नाव देण्याची मागणी

या हायवेला स्वराज्यभूमी कोकण महामार्ग नाव द्यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. माणगाव बायपास, इंदापूर बायपास युद्धपातीवर अशा महत्त्वाचे विषय पूर्ण व्हायला हवेत, कॉन्ट्रॅक्टर काम करत नाही अशी कारण यापुढे सांगू नयेत. कॉन्ट्रॅक्टमध्ये झाडे लावण्याची अट असताना कोणतीही झाडे १७ वर्षात हायवेवर लावली नाही पण होती ती तोडली गेली आहेत.

जोपर्यंत हा हायवे पूर्ण होत नाही आणि सुरक्षित होत नाही तोपर्यंत ग्रीनफिल्ड हायवे सहित इतर कोणताही महामार्ग कोकणात सुरू करू देणार नाही अशा स्वरूपाचा निर्धार जन आक्रोश समितीने यावेळी व्यक्त केला. त्यामुळे गणपतीमध्ये सर्व महामार्ग योग्य करून आम्हाला कोकणातूनच जाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष अजय यादव, समितीचे सचिव रुपेश गर्दे, समृद्ध कोकण संघटनेचे समन्वयक संजय यादवराव यांनी दिली.

या हायवेवर कोकणातील समृध्द जैवविविधता दाखवणारी सह्याद्रीतली सर्व प्रकारची झाडे लावावी आणि हा जगातील सर्वोत्तम बायोडायव्हर्सिटी हायवे बनवावा. छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वासुदेव बळवंत फडके, झाशीची राणी लक्ष्मीबाई खूप सारे राष्ट्रपुरुष कोकणातले आहेत आणि म्हणून या हायवेला स्वराज्यभूमी कोकण महामार्ग नाव द्यावे आणि त्या-त्या गावांच्या जवळ हायवेवर त्या-त्या राष्ट्रपुरुषाची प्रेरणा केंद्र बनवावीत ही मागणी या उपोषणात आपण करत असल्याची ही माहिती संजय यादवराव यांनी महाराष्ट्र टाइम्स जवळ बोलताना दिली आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.