Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Putrada Ekadashi 2024 Mantra : पुत्रदा एकादशीला वाचा श्री विष्णुची स्तुती, संतान होईल सुखी, देवी लक्ष्मीची राहिल अपार कृपा

10

Putrada Ekadashi 2024 Shree Vishnu Mantra : पुत्रदा एकादशीच्या दिवशी श्रीविष्णुची आणि देवी लक्ष्मीची पूजा दाम्पत्यांनी करायली हवी. मनोभावे पूजा करुन उपवासाचा संकल्प करायला हवा. चातुर्मास सुरु झाल्यामुळे या काळात भगवान विष्णू निद्रावस्थेत असतात. त्यामुळे ही एकादशी अधिक खास मानली जाते. या दिवशी वाचा किंवा ऐका श्रीविष्णुची स्तुती, ज्यामुळे संतान प्राप्तीत येणारे अडथळे दूर होऊन लक्ष्मी देवी देखील प्रसन्न होईल.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

Shree Vishnu Stuti In Marathi :

श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला पुत्रदा एकादशी साजरी केली जाते. या एकादशीला पवित्रोपण आणि पवित्र एकादशी असे म्हटले जाते. यंदा ही एकादशी १६ ऑगस्टला असणार आहे.

पुत्रदा एकादशीच्या दिवशी श्रीविष्णुची आणि देवी लक्ष्मीची पूजा दाम्पत्यांनी करायली हवी. मनोभावे पूजा करुन उपवासाचा संकल्प करायला हवा. चातुर्मास सुरु झाल्यामुळे या काळात भगवान विष्णू निद्रावस्थेत असतात. त्यामुळे ही एकादशी अधिक खास मानली जाते.

पुत्रदा एकादशी १५ ऑगस्टला १० वाजून २६ मिनिटांनी सुरु झाली असून १६ ऑगस्टला सकाळी ९ वाजून ३९ मिनिटांनी संपेल. उदयतिथीनुसार या एकादशीचे व्रत १६ ऑगस्टला केले जाणार आहे. या दिवशी वाचा किंवा ऐका श्रीविष्णुची स्तुती, ज्यामुळे संतान प्राप्तीत येणारे अडथळे दूर होऊन लक्ष्मी देवी देखील प्रसन्न होईल.

श्री विष्णु स्तुती

शुक्लाम्बरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजम्।
प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये।।

मङ्गलम् भगवान विष्णुः, मङ्गलम् गरुणध्वजः।
मङ्गलम् पुण्डरी काक्षः, मङ्गलाय तनो हरिः॥

शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं
विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम्।
लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं
वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथम्।।

यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुत: स्तुन्वन्ति दिव्यै: स्तवै-
र्वेदै: साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगा:।
ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो-
यस्तानं न विदु: सुरासुरगणा देवाय तस्मै नम:।।

त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणम् त्वमेव त्वमेव सर्वम् मम देव देव ॥

औषधे चिंतये विष्णुम भोजने च जनार्धनम
शयने पद्मनाभं च विवाहे च प्रजापतिम
युद्धे चक्रधरम देवं प्रवासे च त्रिविक्रमं
नारायणं तनु त्यागे श्रीधरं प्रिय संगमे
दुःस्वप्ने स्मर गोविन्दम संकटे मधुसूधनम
कानने नारासिम्हम च पावके जलाशयिनाम
जलमध्ये वराहम च पर्वते रघु नन्दनं
गमने वामनं चैव सर्व कार्येशु माधवं ॥

षोडशैतानी नमानी प्रातरुत्थाय यह पठेत
सर्वपापा विर्निमुक्तो विष्णुलोके महीयते ॥

कोमल दामुद्रे

लेखकाबद्दलकोमल दामुद्रेकोमल दामुद्रे मागच्या साडेचार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये लिखाण करत आहे. लाईफस्टाइल, टेक, ऑटो, धार्मिक, प्रवास आणि बिझनेस क्षेत्रातील विविध विषयांवर लिखाण. मागच्या दोन वर्षांपासून धार्मिक विषयांवर लिखाण करत आहे. कालनिर्णयमध्ये संपादकीय सहाय्यक. कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक, कालनिर्णय मुख्य एडिशन, कालनिर्णय आरोग्य व कालनिर्णय स्वादिष्ट यावर काम करण्याचा अनुभव. यापूर्वी कोमलने २०१९ मधील लोकसभा निवडणुकांसाठी पीआर म्हणून काम केले. कोमल ला कामाव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून कविता आणि लेख लिहायला आवडतात. नवीन पुस्तके आणि धार्मिक गोष्टी वाचण्यात अधिक रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.