Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

रिलीजच्याच दिवशी स्त्री २ चा थिएटरमध्ये धुमाकूळ; फायटर, पठाण यांसारख्या बिग बजेट सिनेमांना मागे टाकून नवा रेकॉर्ड

12

मुंबई– श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘स्त्री २’ ने बॉक्स ऑफिस गाजवायला सुरुवात केली आहे. १५ ऑगस्टला थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या हॉरर-कॉमेडीने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्याचे चित्र दिसतेय. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी ५४ कोटींहून अधिक कमाई करून सिनेमाने नवा रेकॉर्ड केला आहे. एवढेच नव्हे तर ‘गदर २’, ‘टायगर ३’ आणि ‘जवान’ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांनाही श्रद्धा कपूरच्या या सिनेमाने मागे टाकले आहे. रिपोर्ट्सनुसार, ‘स्त्री २’ चे बजेट ५० कोटी रुपयांपेक्षा थोडे जास्त आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी सिनेमाने आपले बजेट वसूल केले आहे.स्त्री २ ने ‘फायटर’ आणि ‘कल्की २८९८ AD’ सारख्या ब्लॉकबस्टर सिनेमाच्या अडव्हान्स बुकींग सोबतच सलमानच्या ‘टायगर ३’ लाही मागे टाकले आङे. ‘स्त्री २’ची दमदार ओपनिंग होईल, असा अंदाज बांधला जात होता, पण एवढी मोठी ओपनिंग होईल, असे कोणाच्याच ध्यानीमनी नव्हते. ‘स्त्री २’ हा २०२४ मधील सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरला आहे. पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ‘स्त्री २’ची कमाई किती ते जाणून घेऊ.

‘स्त्री २’ हा २०२४ मधील सर्वात मोठा ओपनर आहे, १५ ऑगस्टला हा सिनेमा रिलीज झाला असला तरी त्याच्या एका दिवसाआधी, बुधवारी, १४ ऑगस्ट या सिनेमाची अंदाज कमाई मांडण्यात आलेली. sacnilk च्या अहवालानुसार, अमर कौशिक दिग्दर्शित या चित्रपटाने पेड प्रीव्ह्यूजमधून ८.३५ कोटी रुपये कमावले तर रिलीजच्या दिवशी म्हणजेच पहिल्या दिवशी ४६ कोटी रुपये कमावले. अशा प्रकारे चित्रपटाचे एकूण कलेक्शन ५४.३५ कोटींवर पोहोचले आहे. मात्र, हे अद्याप प्राथमिक आकडे आहेत.

Tharla Tar Mag 16 August: कोण आपलं कोण परकं! आजारपणात अर्जुनला झाली जाणीव,प्रतिमाची स्मृती परत आणायला सायली कसतेय कंबर
पहिल्या दिवशी ‘स्त्री २’ ची ऑक्युपेंसी

१५ ऑगस्ट हा राष्ट्रीय सुट्टीचा दिवस होता त्यामुळे चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये मोठ्या संख्येने प्रेक्षक आले होते. सकाळच्या शोमध्ये ५५.४२%, दुपारच्या शोमध्ये ८४.८६%, संध्याकाळच्या शोमध्ये ८५.००% आणि रात्रीच्या शोमध्ये ८३.०७% प्रेक्षकांची गर्दी होती. या चित्रपटात श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्यासोबत अभिषेक बॅनर्जी, पंकज त्रिपाठी आणि तमन्ना भाटिया यांच्याही भूमिका आहेत. ‘स्त्री’ या सिनेमाला यापूर्वी उत्तम प्रतिसाद मिळालेला त्यामुळे त्याचाच फायदा सिनेमाच्या दुसऱ्या भागालाही झाला.

Mahesh Manjrekar: शोचा होस्ट बदलला तरी महेश मांजरेकरच का आहेत मराठी सिनेइंडस्ट्रीचे ‘बिग बॉस’
‘स्त्री २’ने ‘गदर २’ आणि ‘टायगर ३’सारख्या चित्रपटांना मागे टाकले

२०१८ मध्ये रिलीज झालेल्या ‘स्त्री’ने भारतात ५४.८८ कोटी रुपयांचे कलेक्शन करण्यासाठी ६ दिवस घेतले होते. पण ‘स्त्री २’ हा शाहरुख खानच्या ‘पठान’ आणि ‘जवान’ नंतरचा सर्वात मोठा ओपनिंग करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे. ‘जवान’ने ६५.५ कोटींची ओपनिंग केली, तर ‘पठाण’ने पहिल्या दिवशी ५५ कोटींचा ओपनिंग केली होती. इतकेच नाही तर ‘स्त्री २’ने सनी देओलच्या ‘गदर २’ आणि सलमान खानच्या ‘टायगर ३’लाही मागे टाकले आहे. ‘गदर २’चे ओपनिंग डे कलेक्शन ४०.१० कोटी रुपये होते, तर ‘टायगर ३’ने रिलीजच्या दिवशी ४४.५० कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते. त्यामुळे ‘स्त्री २’ हा २०२४ चा हिंदीतील सर्वात मोठा ओपनर ठरला आहे. पहिल्याच दिवशी सिनेमाने कमालीची कामगिरी केली.

‘स्त्री २’च्या ओपनिंग डेची ॲडव्हान्स बुकिंग

१५ ऑगस्ट ला स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रीय सुट्टी होती. ‘स्त्री २’ साठी याच गोष्टीचा फायदा उठवण्याची मोठी संधी होती. मात्र, यासोबतच अक्षय कुमार आणि फरदीन खानचा ‘खेल खेल में’ आणि जॉन अब्राहमचा ‘वेदा’ ही रिलीज झाला. ‘स्त्री २’ साठी टिकून राहणे आणि या बिग बजेट चित्रपटांसोबत स्पर्धा करणे हा मोठा विजय आहे. याचा फायदा ‘स्त्री’ फ्रँचायझीलाही झाला आहे. ‘स्त्री २’ च्या ॲडव्हान्स बुकिंगवरून तो पहिल्या दिवशी मोठी कमाई करेल हे आधीच स्पष्ट झालेले. बुधवार, १४ ऑगस्ट रोजी त्याचे ॲडव्हान्स बुकिंग खूप वेगाने वाढले होते. पहिल्या दिवसाच्या ॲडव्हान्स बुकिंगमध्ये ‘स्त्री २’ ची ८.२४ लाखाहून अधिक तिकिटे विकली गेली. त्यानुसार, रिलीजपूर्वीच सिनेमाने २३.३६ कोटी रुपयांची बंपर कमाई केली होती. आता जे आकडे आले आहेत त्यात ॲडव्हान्स बुकिंगच्या आकड्यांनाही बाजी मारली आहे. मात्र, हा चित्रपट अद्याप रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ला मागे टाकू शकलेला नाही.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.