Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
कल्याण तालुका ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात हत्या आणि पुरावा नष्ट केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
कल्याण तालुक्यातील वरप गावातील एका रहिवाशाने ही सुटकेस पाहून स्थानिक कल्याण तालुका पोलिसांना माहिती दिल्याने ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून फॉरेन्सिक टीमसमोर बॅग उघडली. यात एका पुरुषाचा मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१५ ऑगस्टच्या सकाळीच कल्याण-मुरबाड मार्गावरील वरप गावात उघड्या जमिनीवरील कचरापट्टीजवळ लघुशंकेसाठी आलेल्या एका व्यक्तीला निळ्या रंगाची सुटकेस सापडली. त्याने ती उघडून पाहिली तेव्हा त्याला दरदरुन घाम फुटला. त्यात या ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह आढळून आला. त्याने तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी परिसरातील तसेच कल्याण- मुरबाड मार्गावरील शंभरहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरांचे फुटेज पोलीस तपासून पाहत आहेत. घटनास्थळी श्वान पथक आणि ठाणे गुन्हे शाखेचे पथकही दाखल झाले आहे. मृतदेहाची ओळख पटवणे आणि आरोपीचा शोध घेणे असे दुहेरी आव्हान पोलिसांसमोर असून त्यांनी समांतर तपास सुरु केला आहे.
दोन आठवड्यांपूर्वी दादर स्टेशनवरही सुटकेसमध्ये मृतदेह सापडला होता. मध्यरात्री दादर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्र. ११ वर एक तरुण तुतारी एक्सप्रेस पकडण्याच्या प्रयत्नात होता. मात्र हातातील बॅग अवजड असल्याने त्याला गाडीत चढता येत नव्हतं. त्याच्या मदतीसाठी स्थानकातला आरपीएफ जवान धावला. पण बॅगेला हात लावताच त्यावरचे रक्ताचे डाग पाहून या प्रकरणाचा उलगडा झाला.