Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Hadapsar Vidhan Sabha : शिंदेंच्या शिलेदाराची जय्यत तयारी; हडपसर भानगिरेंच्या वाट्याला? भाजप दावा सोडणार?
हडपसरच्या श्रीराम चौकात हा प्रभू श्रीरामांचा पुतळा साकारण्यात आला आहे. गेले अनेक दिवस या पुतळ्याच काम सुरू होतं. उद्या, शनिवारी या मूर्तीचं उद्घाटन होणार आहे. त्यासोबतच नाना भानगिरे यांनी विधानसभेच्या तयारी करत असल्यामुळे उद्या उमेदवारीच्या घोषणेची दाट शक्यता आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मिळवण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादीत चांगलीच चढाओढ पाहायला मिळत आहे. त्यातल्यात्यात शिवसेनेत फूट पडल्यानंतर नाना भानगिरे यांनी मुख्यमंत्री शिंदेंना पाठिंबा दिला होता. भाजपासोबत सत्ता स्थापन केल्यानंतर पुण्यातून पाहिले नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणारे नाना भानगिरे आहेत. नाना भानगिरेंसोबत पुण्यातले अनेक मोठे शिवसेनेत नेते ही शिंदेसोबत सहभागी झाले. त्यानंतर हडपसर विधानसभा मतदारसंघात नाना भानगिरे यांनी कामाला सुरुवात केली. लोकसभा निवडणुकीला ही नाना भानगिरे यांच्या वॉर्डतून आढळराव पाटील यांना लीड होते.
विधानसभेसाठी नाना भानगिरे इच्छुक असून लोकसभा निवडणुकीपूर्वीच त्यांनी विधानसभेसाठी तयारी सुरू केली होती. हडपसर मतदारसंघासाठी त्यांनी मोठा निधीदेखील मिळवून दिला आहे. मतदारसंघात कार्यक्रम, तसचे सरकारमार्फत रस्ते-पाणी प्रश्न संदर्भात मोठं काम नाना भानगिरे यांनी केलं आहे. मतदारसंघात युती सरकारमधूनच उमेदवारी स्पर्धा असताना योगेश टिळेकर यांना विधनपरिषदेवर उमेदवारी मिळाल्या नंतर एकप्रकारे रस्ता मोकळा झाला आहे. पण विद्यमान आमदार चेतन तुपे याचा अडथळा कसा सर करणार याकडे लक्ष आहे. मागील निवडणुकीत अवघ्या काही हजार मतांनी भाजपचा या मतदारसंघात पराभव झाला होता. असे असताना यावेळी या मतदारसंघात भाजप सहजासहजी दावा सोडणार का? यात शंकाच.