Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
कॅबमध्ये २५ लाखांचे दागिने विसरले, ड्रायव्हरचा फोन बंद; मुंबई पोलिसांनी अशी मिळवून दिली दागिन्यांची बॅग
नेमकं काय घडलं?
गुरुवारी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४६ वर्षीय व्यवसायिक नजीर उल हसन यांनी १० ऑगस्ट रोजी ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये दागिन्यांनी भरलेली बॅग हरवल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलीस ती बॅग शोधण्यासाठी सतत प्रयत्नशील होते.
९ ऑगस्ट रोजी वसईतून एक कुटुंब उबर कॅबद्वारे जोगेश्वरीला गेलं होतं. जोगेश्वरीतील आदर्श नगरमध्ये त्यांनी त्यांचं सामान घेतलं आणि ते उतरले. पण नंतर कॅब पुढे गेल्यानंतर दागिन्यांची बॅग गायब असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी लगेच कॅब ड्रायव्हरला कॉल केला, पण त्याच्याकडून उडवाउडवीचं उत्तर मिळालं. त्यांनी पुन्हा पुन्हा कॉल केले तेव्हा त्याने कॉल उचलले नाही.
कॅब ड्रायव्हरकडून कोणतीही मदत न मिळाल्याने कुटुंबाने पोलीस स्टेशन गाठलं आणि घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ चौकशी, तपास करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलीस त्या कॅब ड्रायव्हरच्या पत्नीचा फोन नंबर मिळवण्यात यशस्वी झाले. ज्यावेळी पोलिसांनी कॅब ड्रायव्हरच्या पत्नीला कॉल केला, त्यावेळी तिने बॅग तिच्याकडे असल्याचं सांगितलं. त्यांनी पोलीस थेट वसईत पोहोचले आणि त्यांनी कॅब ड्रायव्हरच्या घरातून दागिन्यांची बॅग ताब्यात घेतली.
कॅबमध्ये विसरलेल्या या बॅगमध्ये ३५० ग्रॅमचे सोन्याचे दागिने होते. या दागिन्यांची किंमत २५ लाख रुपये होती. दागिन्यांची बॅग पोलिसांनी व्यावसायिक नजीर उल हसन यांच्याकडे सुपूर्द केली. बॅग परत मिळाल्यानंतर व्यवसायिकाने पोलिसांचे आभार मानत त्यांनी केलेल्या मदतीसाठी त्यांचं कौतुकही केलं आहे.