Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
दहा वर्षापूर्वी पार पडल्या होत्या जम्मू काश्मीर मध्ये निवडणुका
जम्मू काश्मीरमध्ये साधारण दहा वर्षापूर्वी म्हणजेच २०१४ साली निवडणुका पार पडल्या होत्या. ८७ जागांसाठी २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबर अशी निवडणुक प्रक्रिया पार पडली आणि निकाल २३ डिसेंबराला लागला. यामध्ये पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीला सर्वाधिक २८ जागांवर यश मिळाले होते. दुसऱ्या क्रमांकावर भाजपला २५ जागा मिळाल्या होत्या तर नॅशनल कॉन्फ्रेंसला १५ आणि काँग्रेसला १२ जागांवर यश मिळाले होते. तीन जागांवर अपक्षांना आणि छोट्या पक्षांना यश मिळाले होते यामुळे बहुमतांचा आकडा कोणीच गाठला नव्हता.
राजकीय समीकरणे बदलली मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या पीडीपी पक्षाला भाजपने पाठिंबा दिला. त्यानंतर त्यांनी सीएम पदाची शपथ घेतली पण २०१६ ला त्यांचे निधन झाले आणि पुन्हा राजकीय अस्थिरता जम्मू काश्मीरमध्ये निर्माण झाली. त्यानंतर पुन्हा महबूबा मुफ्ती यांना पाठिंबा देत पीडीपी आणि भाजपचे सरकार स्थापन झाले. जून २०१८ ला भाजपने पाठिंबा काढून घेतला. त्यानंतर राज्यपाल शासन लागू झाले मग पुढे ऑगस्ट २०१९ ला केंद्राने राज्याचा दर्जा जम्मू काश्मीरचा काढून घेतला आणि केंद्र शासित प्रदेश असा दर्जा जम्मू काश्मीरला दिला कलम ३७० हटवल्यानंतर आता पहिल्यांदाच जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका पार पडणार आहेत.
यंदा जम्मूमध्ये सहा आणि काश्मीरमध्ये एक सीट वाढली आहे असे एकूण सात सीट वाढल्या आहेत. २०१९ मध्ये जम्मू काश्मीर मधून कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या ८७ जागा होत्या. पण ३७० हटवल्यानंतर लदाखला वेगळे केल्या कारणाने जम्मू काश्मीरच्या चार सीट लदाखमध्ये गेल्या. मग आकडा पुन्हा विधानसभेचा ८३ झाला ज्यामध्ये आत नव्या सात विधानसभा मतदारसंघ वाढवले आहेत आणि आकडा ९० विधानसभा मतदारसंघावर पोहचला आहे.