Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अर्निका सकपाळ मुंबईची श्रावणक्वीन, ‘लेडीज फर्स्ट’ असावं की नाही? मन जिंकणाऱ्या उत्तराने बाजी

10

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : ‘लेडीज फर्स्ट’ ही संकल्पना असावी की नसावी हा एक प्रश्न. हातातील ९० सेकंदांचा वेळ आणि या प्रश्नाला स्वतःजवळची माहिती, प्रसंगावधान राखत दिलेले उत्तर आणि या उत्तराने ‘वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत ‘महाराष्ट्र टाइम्स श्रावणक्वीन’; बेव्हरेज पार्टनर सोसायटी टी; असोसिएट पार्टनर तन्वी हर्बल आणि इंडियन ऑइल; कल्चरल पार्टनर महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’ या स्पर्धेच्या मुंबई विभागाच्या फेरीचा पटकावलेला मुकूट असा अर्निका सकपाळ या सौंदर्यवतीचा प्रवास सुरू झाला. या स्पर्धेमध्ये पूर्वा आढाव मुंबई विभागाची पहिली उपविजेती तर माधुरी छत्तीसे दुसरी उपविजेती ठरली. हे या स्पर्धेचे १६ वे वर्ष आहे.

वांद्रे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे रंगलेल्या मुंबई विभागाच्या अंतिम फेरीत १६ स्पर्धांमधून पाच जणींची निवड झाली आणि त्यानंतर त्यांनी दिलेल्या उत्तराने मुंबईच्या श्रावणक्वीन मुकुटाचा हक्क यंदा कुणाला मिळणार या प्रश्नाचे उत्तर मिळाले. अंतिम पाचपैकी दोन स्पर्धकांना ‘लेडिज फर्स्ट’ या संकल्पनेची गरज नाही, असे वाटले तर तीन जणींनी समान संधीसाठी ‘लेडिज फर्स्ट’ गरजेचे होते, असे मत मांडले.

मालिका, नाटक, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांत लीलया वावर असलेले अभिनेते समीर धर्माधिकारी, मालिकांसोबतच रंगभूमीवर स्वतःचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या कविता लाड मेढेकर, वेबसीरिज, हिंदी चित्रपटामध्ये मराठी अभिनयाचे स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्री अनुजा साठे, मराठी-हिंदी रिअॅलिटी शोमधील लोकप्रिय मराठी चेहरा शिव ठाकरे, आणि युद्धनौकेवर पोस्टिंग झालेल्या भारतीय उपखंडातील पहिल्या महिला राजेश्वरी कोरी यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. रॅम्पवॉक, कलागुण यांच्यासोबतच परीक्षकांनी विविध प्रश्न विचारून या सौंदर्यवतींच्या बुद्धिमत्तेचा, वाक्चातुर्याचेही परीक्षण केले.
Sachin Pilgaonkar Birthday Special: ‘मला अशीच मुलगी हवी होती अन्…’ सचिन पिळगावकरांनी सांगितल्या बायकोबद्दलच्या अपेक्षा
सौंदर्यस्पर्धेमध्ये केवळ सौंदर्याच्या बळावर स्पर्धा जिंकता येत नाही तर आजूबाजूच्या परिस्थितीचे भानही असावे लागते, मराठी सौंदर्यस्पर्धेसाठी मराठी भाषेवर प्रेमही आवश्यक आहे, याची जाणीव या परीक्षकांनी स्पर्धेच्या निमित्ताने स्पर्धकांना करून दिली. या प्रत्येक स्पर्धकाला प्रेक्षकांनी भरभरून प्रोत्साहन दिले. मुंबई आवृत्तीचे निवासी संपादक समीर कर्वे यांनी या सौंदर्यस्पर्धेसंदर्भातील ‘महाराष्ट्र टाइम्स’ची भूमिका मांडली. हे स्पर्धक जग जिंकायची इच्छा व्यक्त करतील तेव्हा महाराष्ट्र टाइम्स त्यांच्यासोबत असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

इंडोवेस्टर्न फेरीपासून सुरू झालेला प्रवास या १६ जणींनी एकमेकांच्या सोबतीने पार केला. या १६ जणींमधून मेघा चव्हाण, अर्निका सकपाळ, सिमरन खेडकर, पूर्वा आढाव, माधुरी छत्तीसे या पाच जणींची मुंबई विभागाच्या अंतिम फेरीसाठी निवड झाली. या पाच जणींना विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तराच्या बळावर अर्निका सकपाळ, पूर्वा आढाव आणि माधुरी छत्तीसे या तिघींचा आता महाराष्ट्राच्या श्रावणक्वीन या स्पर्धेच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे. या तिघींची पुढील स्पर्धा पुणे, नाशिक, नागपूर या विभागीय स्पर्धांमधून निवड झालेल्या अंतिम तीन स्पर्धकांशी होईल. महाराष्ट्राची श्रावणक्वीन या स्पर्धेसाठी त्यांना पुढील १० दिवस अभिनय, मॉडेलिंग, नृत्य अशा विविध क्षेत्रातील तज्त्रांकडून मार्गदर्शन उपलब्ध होईल. या स्पर्धेसाठी सूत्रसंचचालन अभिनेता अक्षय केळकर आणि अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर यांनी केले. परीक्षकांशी गप्पा, स्पर्धकांशी संवाद साधत या दोन्ही कलाकारांनी कार्यक्रमात रंगत आणली.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.