Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Nagpur Mother Son World Record: संविधानातील ७५ कलमं तोंडपाठ, नागपूरच्या मायलेकाची एकाच वेळी विक्रमी झेप, पंचक्रोशीत कौतुक

8

म. टा. प्रतिनिधी, नागपूर : सुप्रिया कुमार मसराम आणि त्यांचा ११ वर्षांचा मुलगा शिवांश यांनी एकाचवेळी निर्धारित वेळेमध्ये भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधानातील ७५ कलमे तोंडपाठ वाचून दाखविली. या मायलेकाच्या अनोख्या विक्रमाची नोंद इंडिया आणि आशिया रेकॉर्ड्स बुकमध्ये झाली आहे.

सुप्रिया आणि शिवांश यांनी दहा मिनिटांचा कालावधी निश्चित केला होता. त्या निर्धारित वेळेमध्ये संविधानातील ७५ कलमे तोंडपाठ म्हणून दाखविण्याचा संकल्प सोडला होता. मात्र, हा विक्रम त्यांनी केवळ ६ मिनिटे २१ सेकंदांत पूर्ण केला. सिव्हिल लाइन्स येथील चिटणवीस सेंटरमध्ये हा आगळावेगळा विक्रम झाला. त्याआधी भवन्स स्कूलमध्ये पाचव्या इयत्तेत शिकणाऱ्या शिवांशने विज्ञानाच्या पुस्तकातील शंभर पानांवर अधोरेखित असलेले शब्द न पाहता अवघ्या ८ मिनिटे आणि ५ सेकंदांमध्ये अचूक सांगितली होती. तसेच एक ते शंभर पानांचे नंबर उलटसुलट उच्चारल्यानंतरही पानांवरील मजूकर शिवांशने आत्मविश्वासाने उच्चारला होता. त्यानंतर आता हा संविधानातील कलमे म्हणण्याचा विक्रम त्याने आईसोबत केला आहे.

शिवांशला व्हायचंय आयएएस अधिकारी…

त्याने मोठे होऊन आयएएस अधिकारी बनायची इच्छा व्यक्त केली आहे. या विक्रमाबाबत मसराम मायलेकाचा सत्कार माजी खासदार अशोक नेते, डॉ. उदय बोधनकर, राजीव भुसारी, प्रा. डॉ. श्रीराम सोनवणे, इंडिया आणि आशिया बुक रेकॉर्ड्सचे संयोजक डॉ. मनोज तत्त्ववादी यांच्या हस्ते झाला. यावेळी सुप्रिया यांच्या मेंटर वैशाली कोढे आणि शिवांशच्या मेंटर गौरी कोढे यांच्या हस्ते मायलेकांना मेडल्स, प्रशस्तीपत्र, भेटवस्तू आणि पुष्षगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी शिवांचे वडील कुमार मसराम यांचीदेखील प्रामुख्याने उपस्थिती होती.

Supriya Sule: दुर्दैव एकाच गोष्टीचं, बहिणीचं नातं भावाला कळलंच नाही; सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोमणा
या विक्रमासाठी दहा मिनिटांचा कालावधी निश्चित केला होता. त्या निर्धारित वेळेमध्ये संविधानातील ७५ कलमे तोंडपाठ म्हणून दाखविण्याचा संकल्प सोडला होता. मात्र, हा विक्रम त्यांनी केवळ ६ मिनिटे २१ सेकंदांत पूर्ण केला. कार्यक्रमाचे संचालन आरजे फरहान यांनी केले. या विक्रमाबद्दल किशोर बागडे, डॉ. प्रवीण मानवटकर, अजय सोनटक्के, सतीश मेश्राम, गोडबोले, डॉ. संजय जैस्वाल, आनंद शर्मा आदींनी दोघांचे कौतुक केले आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.