Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Bomb Threat In Navi Mumbai Mall: नवी मुंबईतील मॉल बॉम्बने उडवण्याची धमकी; पोलीस, बॉम्ब शोध पथक घटनास्थळी, संपूर्ण मॉल केला रिकामा
नवी मुंबईतील वाशी येथे असलेल्या इनऑर्बिट मॉलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मॉल प्रशासनाला एक ईमेलद्वारे बॉम्ब ठेवण्याची माहिती मिळाली. या मेलमुळे प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून मॉलमधील सर्व लोकांना तात्काळ बाहेर काढण्यात आले आहे. संपूर्ण मॉल रिकामे करण्यात आले असून सध्या बॉम्ब शोध पथक आणि डॉग स्क्वॉडकडून मॉलमध्ये तपासणी सुरू आहे. सुरक्षा कारणास्तव मॉलमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या मॉलच्या परिसरात नागरिकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेण्यासाठी सायबर सेलची मदत घेतली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असून मिळालेल्या धमकीच्या सत्यतेची पडताळणी करण्यात येत आहे. अद्याप कोणताही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही, मात्र खबरदारीचा उपाय म्हणून सर्व आवश्यक तपासणी केली जात आहे.
शनिवार असल्याने मॉलमध्ये आज लोकांची संख्या जास्त होती. बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर मॉल प्रशासनाने तातडीने लोकांना बाहेर काढले. सर्व लोकांना बाहेर काढेपर्यंत काही काळ गोंधळाचे वातावरण होते. सध्या मॉलच्या बाहेर मोठी गर्दी झाली आहे.
आज सकाळी गुरुग्राम येथील एबियस मॉल बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली होती. दुपारी १२च्या सुमारास मिळाल्याने या धमकीमुळे एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी तातडीने मॉल रिकामा केला आणि बॉम्ब शोध पथक दाखल झाले.मॉल प्रशासनाला एक ईमल मिळाला होता ज्यात मॉलच्या आत बॉम्ब ठेवण्यात आला असून सर्व जण मारले जातील असे म्हटले होते. इमारतीच्या सर्व भागात बॉम्ब लावण्यात आल्याचे धमकीमध्ये म्हटले होते. दरम्यान पोलिसांच्या तपासात कोणतीही स्फोटक वस्तू सापडली नाही.