Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

विधानसभेला कोणालाच बहुमत नाही, छोट्या पक्षांच्या हाती सत्तेची चावी; काय सांगतो सर्व्हे?

8

मुंबई: राज्यात गेल्या पाच वर्षांत अभूतपूर्व राजकीय घडामोडी घडल्या. सत्तेसाठी राजकीय पक्षांनी, नेत्यांनी विचारांना, तत्त्वांना दिलेली मूठमाती मतदारांनी पाहिली. राज्यातील दोन प्रमुख प्रादेशिक पक्ष याच कालावधीत फुटले. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी सत्ताधारी महायुतीला दणका दिला. विरोधकांना भरभरुन मतदान करत राज्यातील मतदारांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कौल दिला. यामुळे विधानसभा निवडणुकीत मतदार काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

टाईम्स नाऊ आणि मॅट्रिझनं केलेल्या सर्वेक्षणानुसार, विधानसभेला भाजप ९५ ते १०५ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरण्याचा अंदाज आहे. लोकसभेला २३ वरुन थेट ९ वर घसरलेला भाजप विधानसभेला सर्वात मोठा पक्ष ठरेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मागील निवडणुकीत भाजपच्या १०५ जागा आल्या होत्या. तो आकडा कायम राहील असा कयास आहे. गेल्या २ विधानसभा निवडणुकांमध्ये भाजनं शंभरी ओलांडली आहे.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या ओवाळणीवर डल्ला, महिलांचा हिरमोड; योजनेमुळे कोणाचा भरतोय गल्ला?
भाजपसोबत महायुतीत असलेल्या शिंदेसेना आणि अजित पवार गटाला धक्का बसण्याची शक्यता आहे शिंदेसेनेला १९ ते २४, तर अजित पवार गटाला केवळ ७ ते १२ जागा मिळण्याचा अंदाज आहे. महायुतीला १२१ ते १४१ जागा मिळू शकतात. याचा अर्थ महायुती बहुमतापासून दूर राहील. त्यांना लहान पक्ष आणि अपक्षांची गरज भासू शकते. राज्यात विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत. बहुमतासाठी १४५ चा आकडा गरजेचा आहे.

लोकसभेला राज्यात एक नंबरला पक्ष ठरलेल्या काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत ४२ ते ४७ जागा मिळू शकतात. गेल्या निवडणुकीत काँग्रेसनं ४४ जागा जिंकल्या होत्या. त्या कायम राहतील असा अंदाज आहे. ठाकरेसेनेला २६ ते ३१ आणि शरद पवार गटाला २३ ते २८ जागा मिळतील असा कयास आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा आकडा ९१ ते १०६ पर्यंत पोहोचू शकतो. याचा अर्थ महाविकास आघाडी सत्ता स्थापनेपासून राहण्याची शक्यता आहे. अन्य पक्ष आणि अपक्षांना ११ ते १६ जागा मिळण्याची शक्यता आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.