Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

लाडक्या बहिणींना मनस्ताप, रेल्वे प्रवाशांना मेगाब्लॉकचा त्रास; वाचा सकाळच्या दहा हेडलाईन्स

7

१. राज्यात गेल्या पाच वर्षांत अभूतपूर्व राजकीय घडामोडी घडल्या. सत्तेसाठी राजकीय पक्षांनी, नेत्यांनी विचारांना, तत्त्वांना दिलेली मूठमाती मतदारांनी पाहिली. राज्यातील दोन प्रमुख प्रादेशिक पक्ष याच कालावधीत फुटले. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी सत्ताधारी महायुतीला दणका दिला. विरोधकांना भरभरुन मतदान करत राज्यातील मतदारांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कौल दिला. यामुळे विधानसभा निवडणुकीत मतदार काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
२. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना सुरू केल्यानंतर सावत्र भावांनी त्यात खोडा घालण्याचा प्रयत्न केला. त्या अडचणींवर मात करून आम्ही तिघेही त्यांना पुरून उरलो. त्यामुळे या कपटी सावत्र भावांची तुम्ही काळजी करू नका. त्यांना लक्षात ठेवून योग्य वेळी त्यांना योग्य जागा दाखवा,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.

३. ‘राज्यात महाविकास आघाडीचे सरकार पुन्हा आले, तर आम्ही सुरू केलेल्या सर्व योजना बंद केल्या जातील; पण आम्ही ‘लाडकी बहीण योजने’साठी मार्चपर्यंत अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. तुम्ही माता भगिनींनी आशीर्वाद दिला, तर पुढील पाच वर्षे योजनेचे पैसे देत राहू,’ असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

४. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण देताना ‘देशाच्या निवडणुका एकाच वेळी व्हाव्यात’, अशी भूमिका मांडली होती. मात्र, आजही त्यांची कृती ही त्यांच्याच वक्तव्याचा विरोधाभास आहे’, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना केले.

५. लोकसभा निवडणुकीत दणका बसल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली. या योजनेच्या माध्यमातून गोरगरीब महिलांना महिन्याकाठी दीड हजार रुपये मिळणार आहेत. राज्यातील कोट्यवधी महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचा हफ्ता जमा झाला आहे. खात्यात तीन हजार रुपये जमा झाल्याचे मेसेज अनेक महिलांना आले आहेत. पण ही रक्कम काढण्यासाठी बँकेत गेलेल्या लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसला आहे. बातमी वाचा सविस्तर…

६. लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर सत्ताधारी महायुती सरकारनं विधानसभेसाठी कंबर कसली आहे. विधानसभा निवडणूक दिवाळीनंतर होण्याची दाट शक्यता आहे. या निवडणुकीत पुन्हा एकदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होईल. लोकसभेतील पराभवानंतर महायुतीनं लाडकी बहिणसारख्या योजना आणत विधानसभेसाठी मतांची पेरणी सुरु केली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मॅट्रिझनं केलेल्या सर्वेक्षणातून महत्त्वाचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत.

७. ठाणे ते दिवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वांद्रे, चुनाभट्टीदरम्यान आज, रविवारी मध्य रेल्वेने मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेने सांताक्रूझ ते गोरेगावदरम्यान ब्लॉक घेतला आहे. ब्लॉक कालावधीत सिग्नलसह रुळांच्या देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात येतात. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही फेऱ्या विलंबाने धावणार आहेत. बातमी वाचा सविस्तर…

८. समुद्रात पोहोताना किंवा समुद्र स्नानाचा आनंद घेताना नेहमी काळजी घेणे खूप आवश्यक आहे. अतिसाहस जीवावर बेतू शकते. यापूर्वीही पर्यटक बुडाल्याच्या घटना कोकणात काहीवेळा घडल्या आहेत. रत्नागिरी जवळच्या आरे वारे समुद्रात अशीच एक दुर्दैवी घटना शनिवारी घडली आहे. १९ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला आहे. सिद्धार्थ विनायक फासे (वय १९) या तरुणाचा मृत्यू झाला तर प्रविंद्र बिरादार यांना वाचिवण्यात स्थानिकांसह जिवरक्षकांना मोठे यश आले आहे. शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. बातमी वाचा सविस्तर…

९. दिल्लीत एक नवीन क्रिकेट लीग सुरू झाली आहे. दिल्ली प्रीमियर लीग असे या लीगचे नाव आहे. अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर लीगचा सलामीचा सामना दक्षिण दिल्ली सुपरस्टार्स आणि जुनी दिल्ली 6 यांच्यात खेळला गेला. या सामन्यात आयपीएल स्टार ऋषभ पंत जुनी दिल्ली 6 चे कर्णधार होते, तर आयुष बडोनी दक्षिण दिल्ली सुपर स्टार्सचा कर्णधार आहे.

१०. बिग बॉस मराठी सुरू झाल्यापासून सोशल मीडियावर या घरातील वेगवेगळे वाद सतत चर्चेत येत आहेत. घरात कोणतेही टास्क आले की स्पर्धक सदस्यांचा हैदोस सुरू होतो. त्यामुळे आपापल्या आवडत्या कलाकारांना वाचवण्यासाठी बाहेर प्रेक्षकांमध्येही खडा जंगी सुरू होते. संपूर्ण आठवडाभर प्रेक्षक रितेश देशमुखच्या भाऊच्या धक्क्याची आतुरतेने वाट पाहत असतात. येणाऱ्या भाऊच्या धक्क्यावर रितेश कोणाची शाळा घेणार त्याची शोच्या चाहत्यांना उत्सुकता असते. याशिवाय रितेश त्याच्या भाऊच्या धक्क्यावर वेगवेगळे मजेशीर गेम्स ही घेतो. त्यामुळे या शोची रंगत आणखी वाढते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.