Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Thane Dahihandi: ‘चोर’ दहीहंड्यांचा ‘शोर’; सुरक्षेचे नियम धाब्यावर, सर्वसामान्यांना नाहक मनस्ताप

8

विनीत जांगळे, ठाणे : मच गया शोर सारी नगरी रे… असे म्हणत दहीहंड्यांचा थरार अनुभवणाऱ्या ठाण्यात उत्सवाआधीच चोर दहीहंड्याचा अर्थात सराव शिबिरांचा ‘शोर’ जाणवू लागला आहे. राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या झेंड्याखाली आयोजन केल्या जाणाऱ्या या शिबिरांमध्ये सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून थरांवर थर रचले जात आहेत. अनेक ठिकाणी भर रस्त्यात रंगमंच उभारून होणाऱ्या या आयोजनाचा सर्वसामान्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे चोर दहीहंड्यांच्या या ‘शोर’ने कानठळ्या बसत आहेत.

गोकुळष्टमीच्या दिवशी उंच थरांच्या दहीहंडी फोडण्यासाठी मुंबई, ठाण्यात गोविंदा पथके महिनाभर सराव करत असतात. या पूर्वतयारीची रंगीत तालीम म्हणून चोर दहीहंडी उभारण्याची परंपरा आहे. मुंबईच्या माझगाव, गिरणगावात चोर दहीहंडी उभारण्याची चार दशकांची मोठी परंपरा कायम आहे. मात्र, ठाणे शहराची गेल्या काही वर्षांपासून दहीहंडी उत्सवाच्या पंढरीची ओळख निर्माण होत असतानाच, चोर दहीहंडीच्या आयोजनात भर पडत आहे. ठाण्यातील गोविंदा पथकांना सरावाची संधी मिळावी म्हणून चोर दहीहंडी आयोजित केली जाते. या चोर दहीहंडी उत्सवात थरांचे प्रात्यक्षिक दाखवणाऱ्या गोविंदा पथकांना त्यांच्या कामगिरीनुसार रोख बक्षीस आणि आकर्षक चषक देऊन गौरवण्यात येते. या सराव शिबिरांचे आयोजन दहीहंडी उत्सवाच्या आठवडाभर आधी ठाण्यात केले जाते. मात्र, दहीहंडी उत्सवात आयोजकांकडून पथकात सर्वांत वरच्या गोविंदाला बांधले जाणारे सुरक्षेचे साहित्यांचा अभाव या शिबिरांमध्ये दिसतो. रस्त्यातील मुख्य चौकात अथवा पटांगणावर होणाऱ्या सरावशिबिरांमुळे परिसरात वाहतूक कोंडी होते. तसेच थरांचे प्रात्यक्षिक सादर करण्यासाठी येणाऱ्या गोविंदांच्या वाहनांमुळे या कोंडीत भरच पडते.
Rahul Kanal: एकेकाळी आदित्य ठाकरेंचे खास, मातोश्रीच्या जवळचे; राहुल कनालांकडे शिंदेंनी सोपवली मोठी कामगिरी

निवडणुकांच्या तोंडावर ब्रॅण्डिंग

आगामी विधानसभा आणि त्यानंतर होणाऱ्या पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने स्वतःसह आपल्या वरिष्ठ नेत्याच्या आणि पक्षाच्या ब्रॅण्डिंगसाठी हा सराव शिबिरांचा वापर होत आहे. शहरातील सर्व प्रमुख पक्षांच्या बड्या नेत्यांकडून दहीहंडी उत्सवाचे केले जात असताना, त्यांच्या स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांकडून अशा सराव शिबिरांचे आयोजन करण्यात पुढाकार असतो.
Mumbai Vidhan Sabha: मुंबईत विधानसभा निवडणुकीच्या कामांना वेग, पालिकेवर भार, सहा अतिरिक्त निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती

स्थानिक राजकीय गणिते

शहरातील प्रमुख मंडळांसह स्थानिक लहान-मोठी मंडळांचे गोविंदा पथक सराव शिबिरात सहभागी होत असल्याने राजकीय नेतेमंडळींना या ब्रॅण्डिंगचा आगामी निवडणुकांमध्ये काही प्रमाणात फायदा होतो. तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांना वरिष्ठांच्या मर्जीत चमकण्यासाठी गोविंदा मंडळांच्या थरांच्या कौशल्याचा उपयोग होतो.

ठाण्यातील सराव शिबिरांचे प्रमुख आयोजक

– युवा तरुण प्रतिष्ठान, समतानगर
– निष्ठेची सराव दहीहंडी, अष्टविनायक चौक, कोपरी
– साई फाऊंडेशन, सावरकरनगर
– धोबीआळी व तेलीगल्ली मित्रमंडळ, चरई

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.