Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कामाठीपुराचा चेहरा-मोहरा बदलणार, म्हाडा उभारणार ५८ आणि ७८ मजली इमारती; कशी आहे योजना?

8

मुंबई : कामाठीपुराच्या गल्ल्यांमध्ये आता उंचच उंच इमारती उभारल्या जाणार आहेत. या इमारतींच्या प्रकल्पासाठी राज्य सरकारची मंजुरी मिळाली आहे. जवळपास ३९ एकरमध्ये पसरलेल्या या कामाठीपुराचा पुनर्विकास योजना अर्थात रिडेव्हलपमेंट प्लॅन काही दिवसांपूर्वी म्हाडाने सरकारला पाठवला होता. सरकारकडून योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर म्हाडा येत्या काही दिवसांत या प्रकल्पावर काम सुरू करेल. यासाठी लवकरच निविदा निघणार आहेत. त्यानंतर तीन ते चार महिन्यात प्रकल्पावर काम सुरू करण्याची योजना आहे.

म्हाडाला किती घरांची विक्री करता येणार?

म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पामधून म्हाडाला विक्रीसाठी जवळपास १५०० ते १८०० फ्लॅट मिळतील. या फ्लॅटच्या विक्रीमधून १ हजार १ कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, मुंबईत म्हाडाकडे कोणतीही लँड बँक नाही. त्यामुळे हा प्रकल्प सुरू केल्यामुळे म्हाडाकडे सर्वसामान्य जनतेच्या घरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जमिन मिळेल. तसंच यामुळे एकाच ठिकाणी म्हाडा १५०० ते १८०० फ्लॅट्स उपलब्ध करू शकेल.
Vasai News : वसई-विरारमध्ये उभारले जाणार ४ ओव्हरब्रिज, वाहतूककोंडी सुटणार; कुठून कसा असेल मार्ग?

५८ मजली १० इमारती, तर ७८ मजली ८ इमारती

कामाठीपुरा पुनर्विकास योजनेअंतर्गत सरकारने दोन प्रकारच्या इमारती उभारण्याची योजना आखली आहे. या परिसरात एकूण १८ इमारती उभारण्याची योजना आहे. त्यापैकी ५८ मजल्याच्या १० इमारती असणार, तर ७८ मजली ८ इमारती उभारल्या जातील. ७८ मजली इमारतींमधील फ्लॅट्सची म्हाडाकडून विक्री केली जाईल. तर इतरांना ५८ मजल्याच्या १० इमारतींमध्ये जागा दिली जाईल.
Shakuntala Railway Track : स्वातंत्र मिळून ७५ वर्ष पूर्ण, पण आजही राज्यातील एक रेल्वे ट्रॅक ब्रिटिशांच्या ताब्यात, कारण काय?
कामाठीपुराच्या ३९ एकर परिसरात जवळपास ४७५ सेस इमारती, १६३ इतर इमारती, १५ धार्मिक स्थळं, २ शाळा आणि ४ सरकारी कार्यालयं आहेत. या परिसरातील एकूण ५२ इमारती कोसळल्या आहेत. या सर्व लोकांना पुन्हा घरं उपलब्ध करुन देण्याची म्हाडाची जबाबदारी आहे. पुनर्विकास योजनेअंतर्गत तिथे राहणाऱ्या सर्व पात्र नागरिकांना कमीत-कमी ५०० चौरस फूटचं घर मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Nanded News : नांदेडच्या शेतकऱ्याचा पावसाळी रानभाजी कर्टुले लागवडीचा यशस्वी प्रयोग, चार महिन्यात लाखोंचं उत्पन्न

कोणाला किती चौरस फूट घर मिळेल?

या योजनेअंतर्गत ५० मीटरपर्यंत जमिन असलेल्या मालकांना ५०० चौरस फूट घर मिळेल. ५१ ते १०० मीटरपर्यंत जमिन असलेल्या लोकांना ५०० चौरस फुटांची दोन घर मिळतील.

१०१ ते १५० मीटर जमिन असलेल्या मालकांना ५०० चौरस फुटांची ३ घरं, १५१ ते २०० मीटर जमिन मालकांना ५०० चौरस मीटरची ४ घरं देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.