Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

महाबळेश्वरहून फिरण्यासाठी महाडला, आनंदी कुटुंबावर शोककळा; सावित्री नदीत बुडून तिघांचा मृत्यू

10

सातारा : महाबळेश्वर येथील तीन तरुण महाड तालुक्यातील सावित्री नदीत बुडाले असल्याची घटना घडली आहे. मुन्नवर शहाबुद्दीन नालबंद (वय ३८), दिलावर शहाबुद्दीन नालबंद (वय २८) हे दोन सख्खे भाऊ आणि जाहिद जाकीर पटेल (वय २८) या तरुणांचा पाण्यात बुडवून मृत्यू झाला. हे तिघे महाड तालुक्यातील सावित्री नदी किनारी सव येथे असलेल्या दर्गा दर्शनासह, येथील गरम पाण्याचे झरे पाहण्यासाठी गेले होते. त्यानंतर ते तिघे सावित्री नदीत पोहायला उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तिघे बुडाले. या तिघांचे मृतदेह बचाव पथकाला सापडले आहेत. मुन्नवर हा बांधकाम सुपरवायझर, तर त्यांचा भाऊ दिलावर आणि त्याचा मित्र जाहिद हे वेल्डिंग कामगार होते.
Mumbai Police News: कॅबमध्ये २५ लाखांचे दागिने विसरले, ड्रायव्हरचा फोन बंद; मुंबई पोलिसांनी अशी मिळवून दिली दागिन्यांची बॅग
याबाबत घटनास्थळावर मिळालेल्या माहितीनुसार, मुन्नवर शहाबुद्दीन नालबंद त्यांची पत्नी, तीन लहान मुलं, सख्खा भाऊ दिलावर आणि त्याचा मित्र जाहिद पटेल अशा सात जणांसह रविवारी सकाळी महाबळेश्वरमधून महाड येथील सावित्री नदी किनारी असलेल्या सव येथील दर्ग्यामध्ये दर्शनासह, गरम पाण्याचे झरे पाहण्यासाठी गेले होते. सावित्री नदी पात्रात पोहण्यासाठी तिघेही एकत्रित उतरले. बराच वेळ झाला, तरी तिघे बाहेर येत नसल्याने मुन्नवर याची पत्नी घाबरली. तिने रडतच या घटनेबाबतची माहिती परिसरातील नागरिकांना देऊन शोधण्याची विनंती केली. या घटनेची माहिती नागरिकांनी महाड पोलिसांना दिली.
Gaza Attack : जुळ्यांच्या जन्माचा आनंद, बाबा जन्मदाखल्यासाठी निघाले, घरी आले तर दोन्ही बाळांचा अंत
पोलिसांनी तातडीने एनडीआरएफचे बचाव पथक पाचारण केले. काही वेळातच हे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नदीपात्रात या तिघांचा शोध सुरू केला. साडेचार वाजण्याच्या सुमारास दोघांचे, तर पाच वाजता तिसऱ्या तरुणाचा मृतदेह बचाव पथकास शोधण्यात यश आले. हे तीन तरुण बुडाल्याची माहिती समजताच महाबळेश्वर येथील त्यांच्या नातेवाईकांसह, मित्र परिवार महाड येथे दाखल झाला.
महाड येथील रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी तिघांचे मृतदेह दाखल केले आहेत. तरुणांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबियांसह, नातेवाईक, मित्र परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुन्नवर हा तरुण बांधकाम सुपरवायझर म्हणून कामाला होता, तर त्याचा लहान भाऊ दिलावर आणि त्याचा मित्र जाहिद हे दोघं शहरात वेल्डिंग कामगार होते. या घटनेमुळे महाबळेश्वर येथील रांजणवाडी आणि गवळी आळीत शोककळा पसरली आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.