Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

जसा जसा निधी उपलब्ध होईल तसतसे पैसे वाढविले जातील, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

9

संतोष शिराळे, सातारा: लाडकी बहिणी योजनेला केवळ पंधराशे रुपये देऊन आम्ही थांबणार नाही, जस जसा निधी उपलब्ध होईल तसतसे पैसे वाढविले जातील. जर लोकांनी पुन्हा आम्हाला सत्तेत बसविले तर योजनेचे पैसे नक्कीच वाढवले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते साताऱ्यात बोलत होते.

सातारा येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी सन्मान सोहळयाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य उत्पादन मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, जयकुमार गोरे, दिपक चव्हाण आदी उपस्थित होते.

आमच्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभे करावयाचे आहे. त्यांना लखपती झालेले पाहायचे आहे. त्यांच्यासाठी राज्य व केंद्राच्या शासनाच्या योजना लागू करणार आहे. महिला बचत गटांची ६० ते ७० लाख इतकी संख्या आहे‌. तो आकडा वाढवायचा आहे. महिलांचा आत्मसन्मान वाढविला तर राज्याचा विकास होतो, देश पुढे जातो, असे शिंदे म्हणाले.

सुरुवातीपासून लाडकी बहीण योजना योजना बोगस असल्याचे विरोधक सांगत होते. हा चुनावी जमला असल्याचे म्हणत होते. मात्र जेव्हा महिलांच्या खात्यावर पैसे जमा होऊ लागले तेव्हा त्यांचे डोळे पांढरे झाले. लाडकी बहिणी योजनेत ३१ ऑगस्टपर्यंत फॉर्म भरतील त्यांनाही पैसे मिळतील जे राहून जातील त्यांनाही आम्ही जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरचे पैसे देणार आहोत. सरकारने ३३ हजार कोटींची तरतूद केली आहे. विरोधकांनी कितीही खोडा घालण्याचा प्रयत्न केला, ते कोर्टात गेले, तरीही एक कोटी ४० लाख महिलांनी फॉर्म भरले आणि त्यांना त्यांची जागा दाखवली. विरोधक जेवढा खोटा प्रचार करतील, महिलांची बदनामी करतील तेवढे त्यांना महागात पडेल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

आजच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले हे दिसले नाहीत , या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, तसं काही समजू नका, असं काहीही नाही. आमची महायुती मजबूत आहे. आम्हाला, महिलांना शेतकऱ्यांना मदत करायचे आहे, विरोधक म्हणत होते लाडक्या भावाला काय देणार? आम्ही त्यांनाही स्टाईपेंड सुरू केला आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.