Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मुंबईकरांनो रविवारचं नियोजन करताय, मग Timetable बघूनच घराबाहेर पडा, तिन्ही मार्गांवर आज खोळंबा

5

म. टा. प्रतिनिधी, मुंबई : ठाणे ते दिवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वांद्रे, चुनाभट्टीदरम्यान आज, रविवारी मध्य रेल्वेने मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेने सांताक्रूझ ते गोरेगावदरम्यान ब्लॉक घेतला आहे. ब्लॉक कालावधीत सिग्नलसह रुळांच्या देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात येतात. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.

मध्य रेल्वे

स्थानक – ठाणे ते दिवा
मार्ग – पाचवा आणि सहावा
वेळ – सकाळी १०.५० ते दुपारी ३.२०
परिणाम – ब्लॉकमुळे मेल-एक्स्प्रेस जलद मार्गांवरून वळवण्यात येणार आहेत. यामुळे काही अप आणि डाउन जलद लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. सीएसएमटीकडे येणाऱ्या आणि सीएसएमटीकडे जाणाऱ्या २० एक्स्प्रेस विलंबाने धावणार आहेत. गाडी क्रमांक १६३४६ तिरुवनंतपुरम-एलटीटी नेत्रावती एक्स्प्रेस पनवेल स्थानकापर्यंतच चालवण्यात येणार आहे.
Mumbai News: निम्मे भूखंड नूतनीकरणाविना; मुंबई महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा महसूल अडला

हार्बर रेल्वे

स्थानक – सीएसएमटी ते वांद्रे/चुनाभट्टी
मार्ग – अप आणि डाउन
वेळ – सकाळी ११.१० ते दुपारी ४.१०
परिणाम – सीएसएमटी ते वाशी बेलापूर पनवेलदरम्यान धावणाऱ्या अप आणि डाउन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. कुर्ला ते पनवेलदरम्यान २० मिनिटांच्या फरकाने विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. ब्लॉकमुळे नियमित फेऱ्या रद्द राहणार आहेत.
Mumbai Dams: मुंबईकरांना जलदिलासा! धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा, ३२ प्रमुख धरणांची जाणून घ्या स्थिती

पश्चिम रेल्वे

स्थानक – सांताक्रूझ ते गोरेगाव
मार्ग – अप आणि डाउन जलद
वेळ – सकाळी १० ते दुपारी ३
परिणाम – ब्लॉक वेळेत अप आणि डाउन जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.

मध्य रेल्वेवर धावणार लोकलऐवजी बैलगाड्या?

मध्य रेल्वेच्या कारभारामुळे त्रस्त झालेल्या एका प्रवाशाने मध्य रेल्वेच्या कारभाराची तक्रार मंगळवारी ‘एक्स’वर नोंदवली होती. इंग्रजी भाषेतून नोंदवलेल्या या तक्रारीचा सूर पुढीलप्रमाणे होता… ‘प्रिय मध्य रेल्वे, तुम्ही तुमचे वेळापत्रक मोडीत काढा. आणि एक गोष्ट करा, मुंबईत लोकलगाड्या चालवण्याऐवजी बैलगाड्यांची सेवा सुरू करा.’ या पोस्टला ‘रेल्वेसेवा’ या ‘एक्स’ खात्याच्या माध्यमातून प्रतिसाद देण्यात आला. रेल्वे प्रवाशांच्या मदतीसाठीचे अधिकृत खाते, असे या खात्याचे स्वरूप आहे. ‘आवश्यक कार्यवाहीसाठी हा मुद्दा संबंधित अधिकाऱ्यांकडे उपस्थित करण्यात आला आहे’, असे म्हणत, ‘रेल्वेसेवा’ या खात्याने संबंधित प्रवाशाच्या तक्रारीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे! त्यामुळे, आता लोकल गाड्यांऐवजी बैलगाड्या चालवण्याच्या विचारावर मध्य रेल्वे सकारात्मक आहे, असे दिसत आहे!!

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.