Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

लाडक्या बहिणींच्या राखीची गाठ घट्ट, कोलकात्याच्या भगिनीवर सावट काळेकुट्ट, दहा हेडलाईन्स

8

१. विधानसभा निवडणूक २०२४ लांबणीवर पडण्याची शक्यता, डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मतदान होऊन निकाल लागण्याचा अंदाज, ऑक्टोबर महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात विधानसभेचे बिगुल वाजण्याचे संकेत, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना कारणीभूत असल्याचीही चर्चा, इथे क्लिक करुन वाचा सविस्तर

२. माझ्या सख्ख्या भावाचा मृत्यू, देवाभाऊ तुम्ही सख्ख्या भावासारखे धावून आलात, तुमच्यासारखा भाऊ जन्मोजन्मी मिळो, नाशिकमधील लाडक्या बहिणींची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल भावना व्यक्त

३. मुंबई आणि लगतच्या परिसरात ऑगस्टच्या पहिल्या दोन आठवड्यांत फारसा पाऊस न पडल्याने तापमानाचा पारा चढा, दोन वेळा मुंबईचे कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअसच्या वर, रविवारी पुन्हा एकदा कमाल तापमान ३३ अंशाहून जास्त, तर सांताक्रूझ येथे कमाल तापमान ३३.६ अंश सेल्सिअस

४. सांताक्रूझ-चेंबूर जोड रस्त्याकडून येणारी वाहतूक आणि विमानतळाजवळील वाहतूक कोंडीवरील मात्रा असलेला पूल अंतिम टप्प्यात, वळणदार पूल वाकोला आणि सांताक्रूझ यांना जोडणार, देशातील एखाद्या शहरी भागात असलेला हा पहिलाच केबल आधारित पूल

५. म्हाडाची बनावट वेबसाइट सुरू करून घरांसाठी अर्ज करणाऱ्यांची आर्थिक फसवणूक, मुंबई पोलिसांकडून दोघांना अटक, कल्पेश सेवक याने बनावट वेबसाईट तयार केली, अमोल पाटील स्वतः म्हाडा अधिकारी असल्याचे भासवत होता, दोघांचा म्हाडा कार्यालयात राबता, म्हाडाशी संबंधित अनेक कागदपत्रे हस्तगत, म्हाडा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही सहभाग असण्याची शक्यता व्यक्त

६. राजधानी दिल्लीतील करोल बाग परिसरात एसीचं आऊटडोर युनिट पडल्याने तरुणाचा मृत्यू, एक तरुण जखमी, शनिवारी संध्याकाळी सातच्या सुमारास घटना, सोसायटीच्या सीसीटीव्हीत घटना कैद, गुन्हा दाखल करुन तपास सुरु

७. कोलकात्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेज डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट, माजी भारतीय क्रिकेटपटू आणि आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार हरभजन सिंग यांचा पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचावर निशाणा

८. कर्नाटकातील म्हैसुरु अर्बन डेव्हलपमेंट ऑथॉरिटीसंबंधी (मुदा) कथित जमीन वाटप घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात खटला चालवण्यास राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची मंजुरी, सिद्धरामय्या यांनी २२ ऑगस्टला काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली, कायदेशीर लढा देण्याची तयारी

९. भारतीय शेअर मार्केटमध्ये पुन्हा एकदा तेजीची हिरवळ, शुक्रवारची तेजी कायम ठेवून शेअर बाजारात सोमवारी आठवड्याची सुरुवात गोड, रक्षाबंधनाच्या दिवशी गुंतवणूक करणाऱ्या भावांमध्ये उत्साहाची लाट

१०. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर संघात पुनरागमन करण्यासाठी सज्ज, रणजी ट्रॉफीमध्ये घरची टीम बंगालसाठी मैदानात उतरण्याची शक्यता, न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील एक कसोटी सामना खेळण्याचीही चिन्हं

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.