Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
व्हिडीओ मध्ये आपण पाहू शकतो की, ऐन रहदारीच्या वेळी भरधाव ट्रक पुलावरुन जात आहे. मात्र वळण घेताना ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले अन् ट्रक अचानक पलटी झाला आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खंडाळा बोरघाटाच्या अमृतांजन पुलावर हा अपघात झाल्याचे वृत्त आहे. व्हिडीओमधून अपघाताची दाहकता समजत आहे पण सुदैवाने ट्रक चालक या अपघातातून बचावला आहे. अपघात घडताच रस्त्यावरील अन्य वाहनचालकांची देखील एकच तारांबळ उडाली होती.
घाटात अपघाताचे वाढते प्रमाण
अलीकडेच कसारा घाटात दुधाचा टँकर दरीत कोसळून भीषण अपघात घडला होता. त्यात ५ जणांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. भरधाव वेगात असणारा टँकर लोखंडी बॅरिअरवर आदळला आणि २०० फूट खोल दरीत कोसळला. ही घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली होती. नवीन कसारा घाटातील बलगर पॉईंटजवळ हा अपघात झाला. कसारा घाटात उतार असल्याने कंटेनर रस्त्यावर आल्यानंतर कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि कंटेनर बाजूच्या खोल दरीत कोसळला. पोलिसांनी टँकर चालकाविरोधात भारतीय न्यायसंहिता आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा देखील दाखल केला होता. दुर्घटनेत मृत पावलेले लोक आणि चार जखमी लोक मुंबईत येण्यासाठी टँकरने प्रवास करत होते. पण त्यांच्यावर काळाने घाला घातला. मृतांध्ये नऊ वर्षाच्या मुलाचा देखील समावेश आहे. तर जखमींवर गोटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान पंढरपूरहून मंगळवेढ्याकडे निघालेली स्विफ्ट कार पंढरपूरकडे येत असताना आयशर टेम्पोला समोरासमोर जोरदार धडकली आहे. या भीषण अपघातात स्विफ्ट कारचा चक्काचूर झाला आहे. स्विफ्ट कारमधील बहीण भाऊ जागीच ठार झाले आहेत.