Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

गर्दीच्या वेळी ‘टीसी’ असतात तरी कुठे? नियमित तिकीट तपासणीअभावी एसी, फर्स्ट क्लासमध्ये वाढती घुसखोरी

9

म. टा. खास प्रतिनिधी, ठाणे : सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी गर्दीचा फायदा घेत विनातिकीट किंवा प्रथम श्रेणीच्या डब्यांतून किंवा एसी लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत आहे. गुरुवारी चर्चगेट-विरार जलद एसी लोकलमध्ये दोन प्रवाशांनी तिकीट तपासणीसाला मारहाण केल्याचा प्रकार घडला. यानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, गर्दीच्या वेळी हे टीसी असतात कुठे असतात, असा सूर प्रवाशांमधून व्यक्त होत आहे. त्याचवेळी विनातिकीट प्रवाशांची घुसखोरी रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कठोर कारवाई करायला हवी, अशीही मागणी होऊ लागली आहे.

रेल्वे स्थानकांत, प्रवासादरम्यान विनातिकीट प्रवाशांना रोखण्याची जबाबदारी तिकीट तपासणीसांवर आहे. स्थानकांवर टीसी नसणे, किंवा रेल्वेत टीसी नियमित येत नसल्याने आणि विशेषत: गर्दीचा फायदा घेऊन विनातिकीट किंवा अवैध तिकीट घेऊन चढणाऱ्या प्रवाशांच्या संख्या वाढत आहे. या प्रवाशांची तपासणी होत नसल्याने प्रथम श्रेणीसह एसीतील प्रवाशांकडून कायमच नाराजी व्यक्त केली जाते. या वाढत्या घुसखोरीमुळे प्रामाणिक प्रवाशांना मोठा फटका बसत आहे. अनेकदा शाब्दिक वाद हाणामारीपर्यंत पोहोचल्याचे प्रकारही घडले आहेत. टीसींच्या अपुऱ्या संख्येमुळे अनेक मार्गांवर नियमित तपासणी होत नाही. अनेक ठिकाणी गर्दीमध्ये प्रवाशांकडून धक्काबुक्की होऊ शकते, या भितीनेही अनेक तिकीट तपासणीस येत नसल्याचे वास्तवही समोर आले आहे. महिलांच्या डब्यातही अनेकदा नाराजी, संताप व्यक्त करून प्रकरण हातघाईवर आल्याचे दिसते.

कल्याणपुढील स्थानकांत परिस्थिती कठीण

मध्य रेल्वेवर ठाण्याच्या पलीकडील स्थानकांत गर्दीच्यावेळी एकही तिकीट तपासणीस उपस्थित नसतो. त्यांना रेल्वे सुरक्षा बलाकडून आवश्यक कुमक मिळत नाही. गर्दीच्यावेळी विनातिकीट प्रवाशांना शोधणे, जिकीरीचे असल्याने तिकीट तपासणीस लोकलमध्ये चढणेही टाळतात. कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेकडून रेल्वे प्रशासनाकडे तिकीट तपासणीसाच्या अनुपस्थितीसंदर्भात सातत्याने तक्रार केली आहे. या तक्रारींनंतर तपासणी केल्याचे फोटो रेल्वेकडून समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केले जातात. परंतु प्रत्यक्ष गर्दीच्यावेळी टीसी उपलब्ध नसतो. त्यामुळे प्रवाशांना त्रास होत असल्याचा दावा या संघटनेकडून करण्यात येत आहे.

‘रेल्वेचा महसूल बुडतो’

द्वितीय श्रेणीपेक्षा नऊ पट अधिक तिकीट प्रथम श्रेणीच्या तिकीटांसाठी खर्च केले जात आहेत. परंतु अनेक प्रवासी द्वितीय श्रेणीचे तिकीट असताना प्रथम श्रेणीतून प्रवास करतात. अनेकवेळा विनातिकीट प्रवासी द्वितीय श्रेणीत, मालडब्यात, अपंगांसाठी राखीव असलेल्या डब्यात घुसखोरी करतात. एसी आणि प्रथम दर्जाच्या डब्यात अनेक विनातिकीट प्रवासी असतात. त्यामुळे रेल्वेचा मोठा महसूल बुडत आहे. नियमित टीसी येत नसल्याने विनातिकीट प्रवाशी रेल्वेच्या महसुलावर डल्ला मारत आहेत. याकडे लक्ष वेधल्यानंतर प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जाते, असे कल्याण-कसारा-कर्जत प्रवासी संघटनेचे सरचिटणीस श्याम ओबाळे यांनी सांगितले.
Dombivali News : रेल्वेत विसरला दीड लाखांची रोख रक्कम, पोलिसांच्या दक्षतेमुळे डोंबिवलीकर व्यक्तीला अशी मिळाली हरवलेली बॅग
लोकलचा सामान्य असो वा प्रथम श्रेणी डबा, अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. ज्यामुळे प्रामाणिक प्रवाशांना बसायला न मिळणे, गर्दी असल्याने रेल्वेत चढायला न मिळणे आदी गैरसोयींचा सामना सहन करावा लागतो. विनातिकीट प्रवासी अरेरावी करतात. हे रोखण्यासाठी तिकीट पर्यवेक्षकांची संख्या वाढवून फलाट किंवा रेल्वेच्या डब्यात नियमित तिकीट तपासणी व्हावी. – शैलेश गोयल, रेल यूजर्स असोसिएशन, भाईंदर

मी मागील आठ वर्षांपासून मानसरोवर रेल्वे स्थानकावरून दररोज प्रवास करतो. आजपर्यंत मला टीसीने एकदाही अडवल्याचे आठवत नाही. असा अनुभव इतर प्रवाशांनाही येत असणार आहे. खारघर, मानसरोवर, खांदेश्वर स्थानकांत टीसी नसतात. पनवेल स्थानकांत गणवेश नसलेल्या टीसींना प्रवाशांनी जाब विचारला होता. समाजमाध्यमांत त्याचा व्हिडिओ व्हायरल होताच टीसी गणवेशात दिसू लागले आहेत.– दादा मानकामे, कामोठे

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.