Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पुणे : राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. महायुती सरकारने निवडणुकांच्या अनुषंगाने विविध योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्या संदर्भातील यात्रा देखील राज्यभरात सुरू करण्यात आल्या आहेत. परंतु अशातच आता भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये वाद होण्यास सुरवात झाली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांच्यावर भाजपचे नेते जगदीश मुळीक यांनी जोरदार टीका केली आहे.
अमोल मिटकरींनी आपली उंची पहावी
भाजप नेते जगदीश मुळीक यांनी अमोल मिटकरी यांच्यावर टीका केली आहे.ते म्हणाले की,” भारतीय जनता पार्टी, शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस , आरपीआय आणि रासप अशी आमची महायुती भक्कम आहे. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार अत्यंत चांगलं काम करतेय. जुन्नरमध्ये जी घटना घडली त्याचे समर्थन आम्ही करीत नाही. आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांना खुलासा करण्याची मागणी मिटकरी यांनी केली. ती आम्ही खपवून घेणार नाही. अमोल मिटकरी यांनी आपली उंची पहावी आणि पुढची पाऊले उचलावी. महायुती धर्म आपण पाळला पाहिजे.देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नेते आहेत. अमोल मिटकरी यांनी अशा पद्धतीची वक्तव्य करू नये.” असा इशारा वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी मिटकरी यांना दिला आहे.
काय घडलं होतं?
उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा रविवारी जुन्नर विधानसभेतील नारायणगाव येथून जात होती. यावेळी भाजपच्या जुन्नर विधानसभा प्रमुख आशा बुचके काळी साडी परिधान करून रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी थेट अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले होते. या घटनेवर अमोल मिटकारींनी देवेंद्र फडणवीसांकडून घडलेल्या प्रकराबाबत खुलासा मागितला होता. यावरून माजी आमदार जगदीश मुळीक यांनी अमोल मिटकरी यांच्याविरोधात आक्रमक प्रावित्रा घेतला आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीला मोठा धक्का बसला होता. महाविकास आघाडीने लोकसभेत सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत . त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत घवघवीत मिळवण्याचा दोन्ही आघाड्यांचा प्रयत्न असणार आहे.