Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

चिमुकल्यांच्या न्यायासाठी संतप्त नागरिक रेल्वे रुळावर, तब्बल १० तासांनी पहिली ट्रेन रवाना

10

बदलापूर : बदलापुरात दोन चिमुकलींवर शाळेत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी संतप्त नागरिकांनी रस्त्यांवर उतरुन आंदोलन केलं. शहरातील नागरिकांनी चिमुकल्यांना न्याय मिळावा आणि आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी जन आंदोलन केलं. शाळेसमोर आंदोलन केल्यानंतर, जनता आक्रमकपणे बदलापूर रेल्वे स्थानकात रुळावर उतरली. नागरिकांकडून रेलरोको आंदोलन करण्यात आला. आंदोलनामुळे बदलापूर रेल्वे स्थानकात सकाळी १०.१० वाजता रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली होती. सकाळपासून जवळपास ८ तास आंदोलन सुरू होतं. या काळात बदलापुरवरुन सीएसएमटीकडे तसंच बदलापुरहून कर्जतकडे एकही ट्रेन गेली नव्हती. आता तब्बल १० तासांनी कर्जनवरुन निघालेली पहिली लोकल सीएसटीकडे रवाना झाली आहे. मात्र सध्या सीएसएमटी ते अंबरनाथपर्यंत लोकल सुरू असून अंबरनाथ ते कर्जत दरम्यान रेल्वे वाहतूक ठप्प आहे.
Who is Akshay Shinde : कोण आहे अक्षय शिंदे, ज्या नराधमाने बदलापुरात चिमुकल्यांसोबत केलं दृष्कृत्य
संध्याकाळी गर्दीच्या वेळी कल्याण ते अंबरनाथवरून प्रवाशांसाठी राज्य परिवहन आणि केडीएमसीकडे एकूण १०० बस गाड्यांची मागणी केली आहे. मेल-एक्स्प्रेस सरासरी एक तास उशीराने धावत होत्या.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन अंबरनाथ-कसारापर्यंत रेल्वे वाहतूक सुरू होती. मात्र अंबरनाथ ते बदलापूर दरम्यान आंदोलकांमुळे रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली होती. रेल्वे स्थानकात झालेल्या आंदोलनामुळे दुपारी ४ वाजेपर्यंत १२ मेल-एक्स्प्रेस आणि ३० लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. १३ मेल-एक्स्प्रेस बदलापूर-कल्याण ऐवजी दिवा-पनवेल-कर्जतमार्गे चालवण्यात आल्या होत्या, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
Raj Thackeray : संताप आणणारा प्रकार, गुन्हा दाखल करुन घेण्यातच पोलिसांनी १२ तास का लावले? राज ठाकरेंचा सवाल
सकाळी आंदोलकांनी रुळावर येत घोषणा देण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांना वारंवार रुळांवरून हटवण्याचं आवाहन केलं. मात्र आंदोलक ठाम असल्याने त्यांनी रेलरोको करत ट्रॅकवर आंदोलन सुरूच ठेवलं. अखेर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास रेल्वे पोलिसांनी लाठीचार्ज करत आंदोलकांना रुळांवरून दूर केलं. बदलापूर स्थानकात झालेल्या दगडफेकीत ४ रेल्वे पोलीस जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

दरम्यान, नामांकित शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने मुलींवर अत्याचार केल्यानंतर काही दिवस उलटून गेले, तरी याप्रकरणी कोणतीही दखल घेतली जात नव्हती. अखेर संतप्त नागरिक, पालकांनी शाळेसमोर मोठ्या संख्येने उपस्थित राहत आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशा घोषणा देत, रेलरोको करत सरकारला या प्रकरणाची दखल घेण्यास भाग पाडलं.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.