Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अजितदादाच्या मतदारसंघात भाजपचे तिहेरी आव्हान, वडगावशेरीत पेच वाढला; भाजप-राष्ट्रवादीत नवा वाद

8

पुणे (अभिजित दराडे) : पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघात महायुतीत कोणती जागा कोणाला मिळणार यासंदर्भात मोठा पेच वाढला आहे. यामध्ये वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात मोठा पेच निर्माण झाला आहे. वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात आत्ता सुनील टिंगरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार ) आमदार आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा मतदारसंघावर स्वाभाविकपणे राष्ट्रवादीने दावा करत तयारी सुरु केली आहे. नुकतेचं वडगावशेरीमध्ये अजित पवारांची जनसन्मान यात्रा झाली. या दरम्यान अजित पवारांनी सुनील टिंगरे यांच्यासाठी जोरदार बॅटिंग करत पुन्हा सुनील टिंगरेचं उमेदवार असल्याचे संकेत दिले आहेत.

मात्र आता यावरूनच वडगावशेरी मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादीत नवा वाद उभा राहिला आहे. या मतदारसंघात नक्की उमेदवार कोण? यावरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये नवा संघर्ष उभा राहण्याचे चित्र आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत एकसंध राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे विरुद्ध भाजपचे जगदीश मुळीक यांच्यात लढत झाली होती. त्यात जगदीश मुळीक यांचा पराभव झाला होता. त्यानंतर राष्ट्रवादी आणि भाजपची महायुती झाल्याने मुळीक की टिंगरे नक्की उमेदवारी कोणाला द्यायची यावरून वाद सुरु असताना आता भाजपमधील आणखी दोन बडे नेते या शर्यतीत उतरल्याने अजित पवारांसमोर भाजपचे तिहेरी आव्हान उभा राहिले आहे.
Ambernath News: अंबरनाथमध्ये थरारक हिट अँड रनची घटना; दोन कुटुंबातील वाद, कार चालकाने गाडीला ठोकले, अनेकांना चिरडले, महिला, लहान मुलाचा समावेश

भाजपकडून आता वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात माजी आमदार जगदीश मुळीक यांच्यासह माजी नगरसेवक अनिल उर्फ बॉबी टिंगरे आणि माजी आमदार बापूसाहेब पठारे हे देखील इच्छुक आहेत. या तिघांचीही मतदारसंघात जोरदार तयारी सुरु आहे. जगदीश मुळीक हे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी देखील इच्छुक होते मात्र त्यावेळी त्यांना संधी मिळाली नाही म्हणून आता त्यांनी वडगावशेरी विधानसभा मतदारसंघावर ठोस दावा ठोकला आहे.
Pune Crime News: बदलापुरनंतर आता पुण्यात संतापजनक प्रकार; नामांकित शाळेतच अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, १९ वर्षीय विद्यार्थ्याला अटक

तर दुसरीकडे, मी भाजपकडून वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ लढवण्यासाठी इच्छुक आहे. महायुतीमध्ये जागा वाटपाच्या संदर्भात कुठलीही बैठक झाली नाही. त्यामुळे कोणती जागा कुणाला सुटलेली आहे किंवा कोणत्या जागेवर कोणी दावा केला याला अर्थ नाही. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपची ताकद आहे आणि मी भाजपकडून लढण्यासाठी इच्छुक आहे. पक्षाने संधी दिल्यास मी या ठिकाणी निवडणूक लढवणार आणि विजयी देखील येणार असल्याचं अनिल उर्फ बॉबी टिंगरे यांनी महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनशी बोलताना म्हटलंय. दातम्यान, बॉबी टिंगरे यांच्या संपर्कात राष्ट्रवादी ( शरदचंद्र पवार ) पक्ष असल्याची देखील माहिती आहे.

बॉबी टिंगरे यांच्या सोबतच यापूर्वी वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिलेले आणि जुने राष्ट्रवादीचे आणि आता भाजपात असलेले बापू पठारे यांनी देखील वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात पुन्हा शड्डू ठोकला आहे. आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचा मी निश्चय केला आहे. भारतीय जनता पक्षाने मला तिकीट दिलं तर चांगलं आहे अन्यथा माझ्यासाठी इतर पर्याय देखील खुले आहेत त्यात मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा आहेत या चर्चा मी नाकारत देखील नाही. भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी माजी आमदार आणि एका माजी नगरसेवकांनी देखील फिल्डिंग लावली आहे मात्र मी देखील उमेदवारी मिळावी यासाठी माझ्या स्तरावर ताकद लावली आहे. असं बापू पठारे यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीला भाजपच्या तिहेरी आव्हानाला समोरे जावे लागणार की भाजपच्या दोन बड्या माशाला शरद पवार गळाला लागणार हे लवकरच समजेल.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.